आठवताच तुझा चेहरा सखे शब्दांसवे सुर गीत गाते!! पाहताच तुझ नयन ते मन ही मझ का उगा बोलते!! मागे जावी ती ओढ तुझ्या नी प्राजक्ताचे गंध का येते!! वाट ती तुझी परतून येण्या हुरहुर जीवास का लावते!! हरवुन गेले प्राजक्त ही जेव्हा शोधुन पाहीले ह्रदयात ते!! वाटेवरच्या फुलासही मी पुसले क्षण तुझ्या परतीचे!! घुटमळते का तिथेच आता वेडे मन का काही न बोलते!! प्राजक्ताच्या फुलांसवे का तुझीच वाट पहात बसते!! सांग सखे येशील का परतुनी प्राजक्त मनाचे सुकुन जाते!! वेड्या गंधाची ती जाणीव का मनात सतत आता दरवळते!! अखेर पुन्हा नव्याने फुलावी प्राजक्त वाटे जे अनोळखी ते!! गंध ओळखुन पुन्हा सांगती त्यास वाट तुझी पाहते नयन ते!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
