"नकळत तेव्हा कधी
 चुक ती झाली होती!!
 प्रेम झाल अचानक
 जेव्हा ती लाजली होती!!

 ठरवल होत तेव्हाच
 आपल्याला हीच पाहिजे होती!!
 कस विचारू तिला
 जेव्हा ती अनोळखी होती!!

 मैत्री पासुन सुरूवात
 पुन्हा खास जमली होती!!
 विचारुन टाकतो तिला
 जेव्हा ती जवळ होती!!

 मन बोललं थाब जरा
 वेळ चुकीची होती!!
 सोबत तिच्या कोणीतरी
 जेव्हा ती येत होती!!

 खुप काही विचारलं
 माझ्याशी ती बोलत होती!!
 मी मात्र हरवुन गेलो
 जेव्हा ती समोर होती!!

 मन तुटल प्रेम मनातच
 आठवणीत ती राहत होती!!
 आपल्या विश्वात रममाण
 जेव्हा ती चालली होती!!

 कसे समजावे मनाला
 ती जे बोलली होती!!
 मन झाले आनंदी
 जेव्हा ती खुश होती!!

 नकळत तेव्हा कधी
 चुक ती झाली होती!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE