नकळत जेव्हा तू पहावे || कविता || Marathi Kavita Sangrah ||

नकळत जेव्हा मज तु पहावे !! क्षणही ते तिथे रहावे !!
हरवून जावे सारे काही !! माझ्यात तेव्हा तूच उरावे !!

शब्दही ते जणू मिळावे !! अलगद त्या कवितेत लिहावे !!
कोरून ते नाव असे की!! प्रेम मनातले तुझं ते कळावे !!

कधी एकांती उगा हसावे !!  आठवणीत त्या रमून जावे !!
पाहिले ज्या वाटेवरी तुला !! तिथेच मी चालत रहावे !!

पाना फुलांना उगा सांगावे !! तुझ्या येण्याने बहरून जावे
गंध मनातले असे की तेव्हा !! दाही दिशा जणू ते पसरावे !!

शब्द जणु असे का बरसावे ?? माझ्या मना ओले ते करावे !!
चिंब भिजून मी जाता आज !! नकळत तेव्हा समोर असावे !!

ओठांवर यावे नी अबोल व्हावे !! मनात तुझ्याही जणु ते बोलावे!!
हलकेच तू हसता हसता !! नकळत ते प्रेम मझं का सांगावे??


© योगेश

*All Rights Reserved*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *