भाग ४
त्रिशाला भेटून समीर घरी गेला.तेव्हा आकाश त्याची बाहेर वाटच पाहत होता.
“काय सम्या किती वेळ !! वैतागलो बाहेर थांबून !! ” आकाश समीरला जवळ येताना पाहून म्हणाला.
“Sorry!! अरे भेटायला गेलो होतो मित्राला म्हणून उशीर झाला!!” समीर फ्लॅटचा दरवाजा उघडत बोलत होता.
बोलत बोलत दोघेही आत गेले. आकाश सोफ्यावर बसतं म्हणाला.
“कोणाला भेटायला गेला होतास ?”
आकाशच्या या प्रश्नाने समीर शांत राहिला. आकाश पुन्हा म्हणाला.
“अरे कोणाला गेला होतास भेटायला.?”
समीर पुन्हा क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला,
“त्रिशाला!!”
आकाश हे ऐकून अचानक बोलला,
“काय ?? त्रिशाला ??”
“हो !!”
“अरे पण कस काय ?? म्हणजे !! अरे !! तिला ?काय म्हणाली मग ती ?” आकाश कित्येक प्रश्न विचारू लागला.
“अरे काही नाही सहजच भेटायला बोलवलं होत तिने .!! खूप वर्षांनी भेट झाली ना म्हणून !! बर ते जाऊदे !! तू इथे कसाकाय ??”
“आमच्या हीचे नातेवाईक आलेत घरी !! उगाच डोक्यात जातात, म्हटलं चला आज इथे राहुयात!! चालेल ना ??”
आकाश समीरकडे पाहून हसला.
“म्हणजे काय यार !! हे काय विचारणं झालं!! “
समीर आणि आकाश दोघेही कित्येक वेळ बोलत बसले. गॅलरी मध्ये बसून जुन्या आठवणीत गुंग झाले.
“म्हणजे बाबांच्या मर्जीसाठी तिने त्या मंदारशी लग्न केलं तर !”
समीर काहीच बोलला नाही. फक्त मान हलवून होकारार्थी उत्तर देत राहिला.
“आणि उद्या तू भेटायला जाणार आहेस तिला??”
“हो ” समीर मध्येच बोलला.
अजुन पुन्हा म्हणाला.
“पण जाऊ कारे भेटायला मी ??”
“म्हणजे काय !!! जा ना !! हे बघ समीर झालं गेलं यात तुझी काहीच चूक नव्हती ना तिची काहीं चूक होती!! जे काहीं राहून गेलं यात कोणाचीच चूक नाही अस मानायच आणि सगळं विसरून जायचं !!” आकााश सिगरेट ओढत म्हणाला.
“पण मला काय बोलावं काहीच कळणार नाही त्याला !! “
“सगळं विसरून जा भेटायला !!”
समीर आणि आकाश बोलता बोलता झोपी गेले. मध्यरात्री पर्यंत ते बोलत राहिले.
दिवस उजाडला तसे समीरला त्रिशाकडे जाण्याची ओढ लागली. खरतर पुन्हा भेटावं अस त्याला कधीच वाटलं नव्हतं. पण आता त्यालाही मंदारला भेटायचं होत. त्रिशा सुद्धा त्याची वाट पाहत होती.
सगळं आवरून झालं. आकाश सकाळीच आपल्या घरी निघून गेला. जाताना समीरला, नक्की भेटून ये अस निक्षून सांगून गेला. तस समीर आवरून निघाला. क्षणभर त्याचे पाय घुटमळले पण पुन्हा त्या भेटीस आतुर झाले. दिलेल्या पत्त्यावर तो थोड्याच वेळात पोहचला. दरवाजाची बेल वाजवुन थांबला. थोड्याच वेळात दरवाजा उघडला समोर त्रिशा होती.
“समीर !! ये ना !! ये “
त्रिशा समीरला पाहून खुश झाली. त्याला घरात ये म्हणत ती आत गेली. समीर एकटाच बसून होता. समोर त्रिशा आणि मंदारचा फोटो भिंतीवर पाहून तो क्षणभर त्याला पाहत राहिला. त्रिशा बाहेर येत पुन्हा समीरला बोलू लागली.
“तुला पत्ता शोधायला काही अडचण नाहीना झाली !!”
“नाही लगेच मिळाला पत्ता !!” समीर थोडा हळू आवाजात बोलला.
दोघेही थोडा वेळ बोलत बसले. आणि तेवढ्यात कोणीतरी त्रिशाला हाक मारत होतं , तो मंदार होता. त्रिशा आत गेली आणि त्याला बाहेर घेऊन आली. समीर आणि मंदार समोरासमोर आले. समीरला काहीच बोलायचं कळेना. त्रिशा त्याला व्हीलचेअर वर घेऊन आली होती. मंदारला चालता येत नाही. हे त्याला कळलं. तो निशब्द झाला.
“Hii !!मी मंदार !! ” व्हीलचेअर वर बसलेला मंदार हात पुढे करत म्हणाला.
“Hii !!” समीर निशब्द झाला.
“खूप ऐकलंय बर तुझ्या बद्दल मी त्रिशाकडून !! “मंदार हसत म्हणाला.
समीर फक्त त्याच्याकडे पाहून ओठातल्या ओठात हसत प्रतिसाद देत होता. त्रिशा मागे उभी राहून समीरकडे पाहत होती. तिला समीरला काय बोलावं हे कळत नाही लक्षात आल होत.
“तुम्ही दोघे बोलत बसा !! मी आलेच !!” त्रिशा एवढं बोलून आत निघून गेली.
कित्येक वेळ मंदार आणि समीर बोलत राहिले. समीर खूप कमी बोलू लागला, मंदारला ते लक्षात आल त्यामुळे तो लगेच म्हणाला,
“समीर !! तुझी पुस्तक मीपण वाचली आहेत बर !!”
“होका !! तुलाही वाचायला आवडत का ??”
“नाहीरे !! त्रिशा तुझी एवढी मोठी फॅन आहे की तिच्यामुळे मीपण वाचत असतो !!” व्हीलचेअरच्या चाकाकडे पाहत मंदार म्हणाला.
समीरला काय बोलावं तेच कळल नाही, त्याला पाहून मंदार पुन्हा म्हणाला.
“मज्जा केली रे ! मीपण वाचतो पुस्तक खूप वेळ !! काय आहेना या व्हीलचेअर बसून वेळच जाता जात नाही !! मग वाचत असतो कित्येक पुस्तक !!!” मंदार थोडा भावनिक होत म्हणाला.
समीरला ते लक्षात आलं .तेवढ्यात त्रिशा किचन मधुन बाहेर आली. सोबत आणलेली कॉफी देत ती बोलू लागली.
“मंदार आणि मी तुझ्या कित्येक कविता गुणगुणत असतो !! “
त्रिशा आणि मंदार एकमेकांस पाहून हसतात. समीर निशब्द असतो.
तेवढ्यात मंदाराच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. तो मोबाईल मध्ये पाहतो आणि त्रिशाला बोलतो.
“Confirm !!”
त्रिशा फक्त त्याच्याकडे पाहते. आणि म्हणते ,
“आलेच मी !!” आणि ती किचन मध्ये निघून जाते.
समीर पाठमोऱ्या तिला जाताना पाहत राहतो. आणि मग मंदार बोलायला लागतो.
“समीर पण माझी एक कंप्लेंट आहे बर तुझ्याकडे !!”
“कोणती !! ” समीर मंदारकडे पाहत बोलतो.
“कथेत नायक आणि नायिका भेटलेच, तरच प्रेम पूर्ण होत अस नायकाला वाटत राहतं हे !!”
“पण प्रेम केलं तर ते भेटायला हवंच ना?” समीर एकदम प्रश्न विचारतो.
“न भेटताही प्रेम करता येतं ना ??” मंदार समीरच्या डोळ्यात पहात बोलतो.
समीर क्षणभर गोंधळतो. आणि पुन्हा मंदार बोलतो.
” त्रिशा तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करते समीर !!पण ती माझ्यात अडकून पडली आहे !! मी म्हटलं तिला !! तू माझा विचार करू नकोस !! मी काय राहील छान !! पण तू तुझ्या समीरकडे परत जा !! ” मंदार डोळ्यात येणाऱ्या अश्रुस आवरत म्हणाला.
“मंदार !!” समीरच्या ही डोळ्यात मंदारच बोलणं ऐकून पाणी आल. तो उठला आणि मंदार जवळ जात म्हणाला.
“प्रेमाची व्याख्या लिहिताना मी किती छोटा आहे हे मला आज समजतंय!! पण मंदार तुझी ही अवस्था ??”
समीर मंदारकडे पाहत बोलू लागला.
“लग्नाआधी हे जग फिरायची इच्छा होती माझी!! आणि एका अपघाताने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. !! खरतर जीव द्यावा असा मनात विचार होता. पण मी असा असूनही माझ्याशी लग्न करायला तयार असलेल्या त्रिशाला पाहून पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळाली. !!” मंदार समीरला मनातलं बोलू लागला.
“तुला माहितेय पहिल्यांदा पाहिलं ना मी तिला !! तर तिच्या प्रेमातच पडलो मी !! आजही क्षणाक्षणाला ते वाढतच आहे !! ” मंदार समीरकडे एक स्मितहास्य करत म्हणाला.
दोघांत बोलणं चालू असतानाच त्रिशा बाहेर येऊ लागली. समीर आणि मंदार स्वतःला सावरत नीट बसले. मंदार तिला पाहून म्हणाला.
“काहीही म्हणा त्रिशा !! आपण ज्यांचे लिखाण वाचतोना !! त्यांना भेटण्यात वेगळीच मजा असते ! “
“होणं !! ” त्रिशा समीरकडे पाहत म्हणाली.
समीर कित्येक वेळ बसला. आणि पुन्हा तिथून निघाव अस त्याला जाणवू लागलं.
“चल त्रिशा !! मंदार !! मी निघतो आता !! जावं लागेल मला !! “
मंदार हे ऐकून एकदम म्हणाला .
“अरे !! अस कस !! जेवण कर आणि मग जा !”
“खरंच नको !! मी पुन्हा येईल जेवायला कधीतरी!! ” समीर त्रिशाकडे पाहून म्हणाला.
“मग तुला पॅरिसला यावं लागेल बरं का !!” मंदार थोडंसं हसत म्हणाला.
“पॅरिसला ??” समीर प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.
त्यात मध्येच त्रिशा बोलू लागली.
“आम्ही उद्याच पॅरिसला निघतोय !! दोन तीन वर्ष झाली तिकडेच होतो !! मागच्या महिन्यातच इकडे भारतात आलो होतो !! सगळ्यांशी भेट होईल या निमित्ताने !!” त्रिशा कित्येक वेळ समीरकडे पाहत राहिली.
“आत्ताच आला मेसेजपण फ्लाईट ची tickets book झाली म्हणून!!” मंदार मोबाईल मध्ये पाहतो.
समीर क्षणभर निशब्द झाला आणि म्हणाला,
“उद्या किती वाजता निघत आहात ??”
“संध्याकाळी सहा वाजता आहे फ्लाईट !!” त्रिशा शांत बोलत होती. तिच्या आवाजात एक दुःख जाणवत होत.
“ओके!!”
एवढं बोलून समीर आता निघाला.
त्रिशा त्याला सोडायला बाहेर पर्यंत आली. समीर तिला येताना पाहून म्हणाला.
“मी जातो आता !! “
“नक्की !!” त्रिशा अगदिक होत म्हणाली.
समीर दोन पावले पुढे गेला आणि मागे फिरून तिला म्हणाला.
” जायच्या आधी एकदा भेटशील मला??”
समीर असे म्हणताच त्रिशाच्या डोळ्यात पाणी आले. तिला काय बोलावं कळलंच नाही. मान होकारार्थी हलवत ती फक्त हो म्हणाली.
समीर निघाला त्याला जाताना त्रिशा कित्येक वेळ पाहत राहिली.