नकळत || कथा भाग ३ || NAKALAT || LOVE STORY ||

भाग ३

समीर,
I’m really sorry ..!! तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे !! प्लीज !! “
समीरने मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.
“नाही!! मला तुला भेटायचं नाहीये !! Sorry!!”
मेसेज केल्या नंतर कित्येक वेळा नंतर त्रिशाचा पुन्हा रिप्लाय आला.
“एकदा भेटशील फक्त !! खूप काही बोलायचं आहे रे मला !!”
“नको पुन्हा जुन्या आठवणी जाग्या करुस त्रिषा!! तू तुझ्या संसारात खुश रहा !! मला बाकी काही नको !! ” पुन्हा समीरने रिप्लाय केला.
“तू नाही भेटलास तर मी कधीच खुश नाही होऊ शकणार !!” समीर या मेसेज नंतर कित्येक वेळ विचार करत राहिला आणि पुन्हा त्याने मेसेज केला.
“ठीक आहे !! कुठे भेटायचं ??”
“आपण दोघे पूर्वी भेटायचो त्याच कॅन्टीन मध्ये भेटुयात !! कॉलेज शेजारी! सकाळी १० वाजता! “
“Ok !!”
उद्या भेटायचं अस सांगून समीर त्रिशाच्या कित्येक आठवणीत गुंतला. स्वतःला त्या जुन्या कॅन्टीन मध्ये पाहू लागला. डोळ्या समोर कित्येक चित्र फिरू लागले. आणि जणू बोलू लागले.
“मी आणि त्रिशा तासनतास त्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसायचो. गप्पा, मस्करी , वाद-विवाद सगळं काही व्हायचं तिथे. पण मनभेद कधीच झाला नाही. मी त्रिशा, आकाश ,सायली, मन्या , ओंक्या आमचा नुसता गोंधळ असायचा तिथे. काय दिवस होते यार !! ” समीर सिगारेट ओढत कित्येक वेळ तसचं बसून राहिला. पाहता पाहता आठवणींच्या शहरातून बाहेर येई पर्यंत सकाळ झाली होती.
समीर घड्याळात पाहतो तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. लगबगीने तो उठतो आणि आवरू लागतो. मनात कितीही राग असला तरी ते प्रेम त्याला तिच्याकडे खेचत होत. त्यालाही ते माहीत होत. की आपण कधीच निष्ठुर वागू शकणार नाही. राग असेल पण तो प्रेमाच्या वाटेवर असेल हेही त्याला माहित होत. कितीही प्रयत्न केला तरी त्याला निघायला उशीर झाला. रात्रभर तो जागाच राहिला होता त्यामुळे त्याचा चेहरा सुकून गेला होता. अखेर तो त्या कॅन्टीन जवळ येतो. तेव्हा त्रिशा त्याच्या आधीच तिथे येऊन बसली होती. कित्येक वेळ झालं त्याची वाट पाहत होती. समीर तिच्या जवळ जातो.
“Sorry !! थोडा late झाला!! ” समीर त्रिशाकडे पाहत म्हणतो.
त्रिशा त्याच्याकडे पाहून हसते. अगदी हलकेच पाहते, आणि म्हणते,
“काही हरकत नाहीरे !! मीपण आत्ताचं आले आहे !!” त्रिशा कित्येक वेळ वाट पाहत बसली होती हे ती त्याला सांगतच नाही.
समीर समोरच्य खुर्चीवर बसतो. दोघे कित्येक वेळ काहीच बोलत नाहीत. तेवढ्यात कॅन्टीनचा वेटर मध्येच येतो आणि म्हणतो.
“मॅम !! तीन तास झालं बसलाय तुम्ही इथे !! आता तरी काही ऑर्डर द्या ना !”
त्रिशा क्षणभर गोंधळून जाते आणि म्हणते
“दोन कॉफी !! “
आणि वेटर निघून जातो.
समीर फक्त त्रिशाकडे पाहत राहतो. त्याला जे म्हणायचं होत ते नकळत तिला कळल होत, आणि मग न राहवून त्रिशा बोलायला सुरुवात करते.
“दहा वर्षात किती काही बदलून गेलं ना समीर !!”
समीर काहीच बोलत नाही , फक्त त्रिशाकडे एकदा पाहतो.
“या दहा वर्षात कुठे होतास ,कसा होतास !! मला काही माहीत नव्हतं. अस नाही की मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. पण मी माझ्यातच एवढी गुंतून गेले की मला तुझ्यापर्यंत पोहचताच आलं नाही. ” त्रिशा मनातलं बोलू लागली.
“मग आज पुन्हा भेटण्याचं कारण काय ?” समीर अगदी तुटक बोलला.
“या दहा वर्षात खूप काही साचलं आहे रे या मनात !! तुझ्या कित्येक आठवणी आहेत !! तू आहेस आणि !!!”
“आणि काय ?” समीर प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला.
“आणि मंदार आहे !!” त्रिशा लगेच बोलली.
“मंदार कोण ?”
“My husband!!”
त्रिशा असे म्हणताच समीर क्षणभर अस्थिर झाला. आणि म्हणाला.
“चल मी निघतो !! “
“नाही समीर !! थांब !! खूप वर्षांनी मला माझं मन मोकळं करायचं आहे !! “
“पण माझं मन नाही ऐकू शकणार हे !! तुला माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणासोबत पाहणं मला नाही शक्य होणार !!”
समीर जागेवरून उठतं म्हणाला. त्रिशा त्याचा हात धरून त्याला बसवू लागते.
“मला तुझी ही स्थिती बघवत नाहीरे समीर !! ” त्रिशाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
समीर तिच्याकडे पाहाताच खाली बसला.
समीर बसताच त्रिशाही पुन्हा समोरच्या खुर्चीवर बसली. आणि बोलू लागली.
“तुला वाटत की तुला न सांगता तुझ्या आयुष्यातून निघून गेले !! पण तस नाहीरे समीर !!”
“नकोस पुन्हा यात गुंतुस त्रिशा !! ” समीर फक्त एवढंच म्हणाला.
“पण तुला ऐकावं लागेल समीर !! एकदा ऐकून घे !! “
समीर आता शांत झाला होता. तो त्रिशाच सगळं बोलणं शांत ऐकू लागला.
“कॉलेज मध्ये आपण एवढं गुंग होतो की बाहेर काय चालतं हे आपल्याला माहीतच नसतं !! तू होतास आणि मी !! आपलं तस दुसरं जगच नव्हतं !! पण आपली ही सगळ्यात मोठी चूक होती. आपलं घर हे ही एक वेगळं जग आहे हे तेव्हा आपल्या लक्षात येत. आणि तसचं काहीस माझं झालं !! तुला माहितेय लास्ट इअर नंतर आपण पिकनिकला गेलो होतो !! “
“हो ! कसा विसरेल मी !! ती आपली शेवटची भेट !!” समीर कॉफी घेत म्हणाला.
“त्यावेळी बाबांचा फोन आला!! मला लगेच ये म्हणाले.!! खूप अर्जंट आहे !! मी तसचं निघाले !! कोणाला काहीही न सांगता !! आणि कारणं, काय झालं आहे हे मलाही माहित नव्हतं !! ” त्रिशा अगदी अगदिक होऊन म्हणाली.
“तू न सांगताच गेली होतीस !!”
” पण ती वेळच तशी होती रे !! बाबांचा शब्द मोडायचा नको म्हणून मी काहीच तुला बोलले नाही !मला म्हणाले कोणाला काही बोलत बसू नकोस !! लगेच ये! तडक नाशिकला निघून गेले !तेव्हा तिथे पहाते तर बाबा गेले होते !जायच्या आधी त्यांनी मला कॉल केला होता! मी येई पर्यंत खूप काळजी करेन म्हणून त्यांनी फोनवर मला काहीच सांगितलं नव्हतं !! ” त्रिशा डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती. तीचं बोलणं ऐकून समीरही आता तिला सावरत होता.
“पण पुन्हा तू कधीच मला काही नाही भेटलीस ?? मला खरंच हे आज कळतंय तुझ्याकडून, तुझ्या बाबांन बद्दल !!”
“कारण बाबांनी माझं भविष्य आधीच ठरवलं होत !! मंदारशी लग्न ठरवलं होत.!! आणि बाबांची शेवटची इच्छा म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं !! ” त्रिशा आता सावरली होती.
समीर आता तिला मनमोकळ बोलू लागला. कित्येक रागाचे बंध आता तुटून पडले होते.
“खरंच ..!! मला माफ कर त्रिशा !!! मी तुला समजून न घेता !! तुला दोषी ठरवल !!पण तू अशी निघून गेलीस की मला तुझा राग आला !! पण यानंतर तरी तू पुन्हा कधीच भेटायचा प्रयत्न केला नाहीस!!!”
“तुझ्या समोर यायचं धाडस होत नव्हतं रे !!”
“राग होता तुझ्याबद्दल!!पण प्रेम आजही कमी नाही !! ” समीर एक गोड स्मित करत म्हणाला.
दोघेही क्षणभर शांत झाले. आणि अचानक समिरचा फोन वाजतो. समीर फोन उचलतो आणि बोलतो.
“हॅलो !!हा बोल आकाश !! “
“अरे सम्या कुठे आहेस तू !! तुझ्या घरी आलो मी !! “
“आलोच मी थोड्या वेळात !! थांब तू ! “
“हो ये !! मी थांबतो तोपर्यंत !! “
“ओके “
त्रिशा फोनवर बोलत असलेल्या समीरकडे बघत असते . समीर फोन ठेवतो आणि त्रिशा बोलते.
“कुठे जायचं आहे का तुला ? “
“Actually !! आकाश आलाय घरी !! !” समीर थोड खुर्चीवर स्वतःला सावरून बसतं म्हणतो.
“ठीक आहे मग आपण पुन्हा भेटुयात !! किंवा अस कर ना !! उद्या माझ्या घरीच का येत नाहीस !! मंदारला ही भेटणं होईल तुला !! “
समीर हे ऐकून थोडा वेळ शांत बसतो. पण तेवढ्यात त्रिशाच बोलते.
“ये ना रे !! प्लीज !! “
त्रिशा कित्येक वेळ त्याला मनवते. आणि अखेर समीर बोलतो.
“ठीक आहे येतो नक्की !! नक्की येतो !!”
त्रिशा हे ऐकुन खुश होते .
“ठीक आहे !! Address मी तुला मेसेज करते!! मग उद्या भेटुयात !! संध्याकाळी !! ओके !!”
“ओके”
समीर आणि त्रिशा दोघेही जायला निघतात. त्रिशाला आपल्या मनावरच ओझ कमी झाल्यासारख वाटत होत. समीर ही आता त्रिशा बद्दल राग विसरून नव्याने विचार करू लागला होता.
पुन्हा उद्या भेटण्याचं वचन देऊन दोघेही गेले. समीर घरी आला. तिथे आकाश त्याची वाटच पाहत होता

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *