भाग २
समीर नजर चुकवून गेला हे त्रिशाने पाहिलं. ती काहीच न बोलता समोर असलेल्या आकाशला बोलू लागली. पण तिची नजर समीर तिच्यापासून दूर जात आहे याकडेच होती.मनात कित्येक विचार करत होती.
“आज कित्येक वर्षांनंतर समीर भेटला. पण मला तो माझा समीर वाटलाच नाही. मला टाळून तो कधीच गेला नव्हता. पण आज कदाचित मी दुसऱ्याच समीरला भेटले. जो मला पाहून निघून गेला. “
“त्रिशा !! लक्ष कुठ आहे तुझ ??” शेजारीच उभी असलेली सायली तिला बोलत होती.
सायली आणि आकाश बोलत बोलत त्रिशापासून वेगळे झाले. दोघेच बोलत बसले. त्रिशा कित्येक वेळ एकटीच बसून होती. काही मित्र मध्येच येऊन क्षणभर बोलून जात होते एवढंच. पण समीर काही तिच्याकडे येत नाही हे तिला लक्षात आले. एका बाजूला समीरही एकटाच बसून होता. अखेर त्रिशाच उठून समीरकडे गेली. तिला आपल्या जवळ येताना पाहून समीर थोडा गोंधळून गेला.
“Hii..!!” त्रिशा समीर समोर येत म्हणाली.
समीर थोडा हळू आवाजातच बोलला.
“Hii!!”
“कसा आहेस ??”
“मी ठीक,, तू कशी आहेस ??” समीर तिच्याकडे पाहत म्हणाला.
“मीपण मजेत !!”
“कधी आलास ??”
“Just आत्ताचं आलोय !!”
“बाकी ??”
“मस्त !!”
समीर आणि त्रिशा मनमोकळ बोलतच नव्हते. त्यांनाही ते जाणवून आलं. नात्यावर कित्येक वर्षांची धूळ बसली होती. कदाचित त्याची जाणीव दोघांनाही झाली होती.
“तुझं पुस्तक वाचलं मी मध्ये !! खूप छान लिहिलंय !!” त्रिशा लांब उभारलेल्या आकाशाकडे पाहू लागली. तोही त्या दोघांकडे फक्त पाहत राहिला.
“तू वाचलंस माझं पुस्तक ??” समीर आश्चर्य होऊन पाहू लागला.
“तुझी आतापर्यंतची सगळी पुस्तकं वाचली मी !!” आता त्रिशा थोडी मनमोकळ बोलू लागली.
“Nice !! ” पण अजुनही समीर तुटकच बोलत होता.
त्या छोट्याश्या get-together मध्ये सगळे गुंग झाले होते. जुन्या मित्रांन मध्ये कित्येक आठवणी जाग्या करत होते. पण या जुन्या आठवणीत एक हळूवार प्रेमाची आठवणही आपली पान उलगडू पाहत होती. समीर आणि त्रिशा आपल्यात हरवून गेली होती. मध्येच एखादा मित्र यायचा आणि दोघांना बोलत बसायचा. पण दोघेही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. बोलायचं खूप होत पण दोघांनाही शब्द भेटत नव्हते.
“तुझ्या प्रत्येक कथेत , नायक आणि नायिका यांचं प्रेम अखेर अधुरेच राहिलं हे थोड मनाला लागत रे !!” त्रिशा समीरला अगदिक होऊन म्हणाली.
“मलाही ते खटकत खूप ! ” समीर त्रिशाकडे पाहत राहिला. तिला पुढे काय बोलावं सुचेचना. ती क्षणभर शांत झाली. तिच्या डोळ्यात अलगद एक अश्रू आला. पण तिने तो समीरच्या नकळत पुसला.
“आयुष्यात फक्त सोबत असणं यालाच प्रेम म्हणतात ??” त्रिशा शांत म्हणाली.
“नाही !! पण न सांगता निघून जाणं याला तरी कुठ प्रेम म्हणायचं ??” समीर त्रिशाकडे कित्येक वेळ नजर रोखत म्हणाला.
त्रिशा आणि समीर कित्येक वेळ बोलत बसले. सायली आणि आकाशही रमले होते. बघता बघता get-together पार्टी संपत आली होती. सगळ्यांनी खूप मजा केली. अखेर निघताना सगळे एकमेकांना पुन्हा भेटण्याचं वचन देऊ लागले.
“चल सायली !! पुन्हा भेटू आपण !! नंबर तर घेतला आहेच तुझा !! उद्या call करतो..!! ” आकाश सायलीला मिठी मारत बोलत होता. शेजारीच त्रिशा आणि समीर उभे होते.
तेवढ्यात त्रिशाचा फोन वाजतो. ती उचलते आणि बोलते .
” हॅलो !! हा बोल !! हा आलेच !! लगेच आले !! Wait !! ” एवढं बोलून ती फोन कट करून कोणाला काहीही न बोलता निघून जाते. समीर आकाश फक्त बघत राहतात. सायली तिच्या मागे अक्षरशः पळत जाते. तिलाही काही कळत नाही.
“समीर !! ” आकाश समीरकडे पाहतो आणि बोलतो.
“चल यार !! निघू आता !! तुला जाताना सोडायचं आहे !! आणि मग पुन्हा खूप उशीर होतो!! “
समीर आणि आकाश दोघेही पुन्हा घरी जायला निघतात. Get-together चे कित्येक सुंदर क्षण सोबत घेऊन जातात.
कार मध्ये जाताना दोघेही एकमेकांशी खूप काही बोलत असतात. त्रिशा तिची भेट, सायली काय म्हणाली. वगैरे वगैरे.
“मग !! काय झालं का बोलणं ??” आकाश हसत समीरला विचारतो.
“खास अस काही नाहीरे !! ” सहजच झालं बोलणं!! विशेष अस काही नाही.”
“हा तरीपण बोललीना ती !! भेटलात ना तुम्ही !! “
” हो पण !! आकाश यार ! तीचं लग्न झालं !! आणि ती पूर्वीच्या सगळ्या आठवणींतून बाहेर पडली असावी असच वाटलं मला!! मी भेटलो त्रिशा सरदेसाईला !! पण ही माझी त्रिशा नव्हती रे !! माझी वाटलीच नाही”
“काय म्हणतोय सम्या तू काही कळल नाही बघ!!”
“She’s married !! मी त्रिशाला भेटलो !! पण मी जिच्यावर प्रेम करत होतो ती ही नाहीरे !! तीच वागणं बोलणं सगळं सारखं होत !! पण ती माझं प्रेम नाही, तर कोणाचं तरी आयुष्य झाली होती.!!” समीर डोळ्यात आलेला एक अश्रू पुसत म्हणाला.
“अरे यार सम्या !!! एवढं इमोशनल नको होऊस यार !! हे बघ !! आपण कॉलेज नंतर दहा वर्षांनी भेटत आहोत !! तीच लग्न झालेलं असणार !! त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! छोड ना यार !! ” आकाश समीरला समजावून सांगत होता.
“आजही ती न सांगता निघून गेली !!आजही तिची ती सवय काही गेली नाही !! “
“काहीतरी काम असेल अर्जंट !! आकाश सावरत म्हणाला.
आकाश समीरला त्याच्या घरी सोडून गेला. समीर एकटाच कित्येक वेळ फ्लॅटमध्ये रात्रभर त्रिशाच्या आठवणीत जागत राहिला.
“आज दहा वर्षा नंतर भेटलो तेव्हा खरंतर एका क्षणाला आनंद वाटला होता. पण तिच्या केसाच्या मध्ये हलकंस असलेलं कुंकू मला खूप काही बोलून गेलं. ती समोर आली तेव्हा एक क्षण मी हरवून गेलो तिच्यात, पण ते माथ्यावरच कुंकू मला खूप काही सांगून गेल. आयुष्यभर तिच्या आठवणीत एकटं राहायचं ठरवल होत. ती साथ द्यायला नक्की येईल कधीतरी, अस मन सतत म्हणत होत. पण एका क्षणात सार काही संपलं. ती येणार ही आशा मला एकांतात साथ देत होती. पण ती कधीच आता येणार नाही ही जाणीव मला एक एक क्षण जाळत आहे !!”समीर सिगरेट ओढत कित्येक वेळ बसला.
त्या सिगारेटच्या धुरात सगळं काही अंधुक झालं होत. आणि मध्येच मोबाइलची मेसेज टोन वाजते. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला ते समीर पाहतो. तर तो त्रिशाचा असतो.
समीर मेसेज वाचू लागतो.