भाग १
“आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगितलं होतं की आता पुन्हा प्रेमात पडायचं नाही. ती आली पुन्हा तरी तिला माफ करायचं नाही. पण जेव्हा तिचा आठवणीतला चेहरा पाहतो तेव्हा सगळं हे ठरवलेलं चुकीचं होईल अस वाटत राहतं. पण मनाचा निर्धार मी आता केला आहे. ती समोर आली तरी तिला बोलणार नाही. पण खरंच इतका निष्ठुर वागू शकेल का ? माझंच मला नाही सांगता येणार. पण एवढं मात्र नक्की की तिला आयुष्यभर मी माफ नाही करणार. भेटलीच कधी तर .. तर?? नाही नको .!! मला नाही पुढचं लिहिता येणार ..!! ” समीर लिहिता लिहिता थांबला. आणि तेवढ्यात फोन वाजला. फोन उचलताच बोलू लागला.
” हा बोल आकाश !! “
फोनवर आकाश त्याचा जुना मित्र समीरला बोलू लागला.
“आज येतोयस ना तू संध्याकाळी!! “
“संध्याकाळी काय ?? ” समीर म्हणाला.
“अरे !! विसरला तू !! Get-together आहे यार आपलं !! “
“अरे !! नाही ..!! मी नाही येत यार आकाश !!”
“ये नाही वैगेरे काही चालणार नाही बरं !! भेटायचं आहे संध्याकाळी !! चल बाय !! “
आकाश लगेच फोन कट करतो.
समीर कित्येक वेळ विचार करत बसतो. त्याला तिथे जायचं नसतं. पण तरीही त्याला जावं लागत होत.
“आज कित्येक वर्ष लोटून गेल्यावर पुन्हा त्याच जुन्या सुंदर आठवणीत कोणाला जाऊ वाटणार नाही !! पण त्या आठवणी जर नकळत त्रासच देणार असतील तर !! मग कशाला भेटाव पुन्हा त्यांना !! पण नको म्हणूनही त्या समोर येत असतील तर…!! काय करावं !!आठवणीतल्या त्या कप्प्यात पुन्हा तिच्याशी भेट होणार.!! तिला पाहून मी पुन्हा तिच्याकडे खेचला जाणार. त्यापेक्षा गेलोच नाही तर ..!! पुन्हा सगळ्या मित्रात उगाच उलट सुलट अर्थ निघतील. त्यापेक्षा गेलेलच बर..! ” समीर आपल्याच विचारात कित्येक वेळ बसून होता.
“ती वेळच सुंदर असते ना !! जेव्हा आपल्या आवडती व्यक्ती आपल्या सोबत असते !! तिच्यासोबत फिरायच , बाहेर जायचं, मजा करायची.कित्येक गोष्टी करायच्या, ज्या मनाला आनंद देतील. आपलं सुख , आपलं दुःख सगळं काही वाटून घ्यायचं. पुन्हा अचानक वेळ बदलून गेली की, त्यांनीही बदलायच आणि अस बदलायच की एका क्षणाचाही विचार न करता एकटं टाकून सोडून जायचं. मग उरलं काय ते फक्त आपण पाहत बसायचं. त्या आठवणी उगाच जवळ घेऊन बसायचं. फक्त तिच्यासाठी.”
समीर डोळ्यातले अश्रू पुसत उठला. एव्हाना संध्याकाळ होत आली होती. या विचारात कित्येक वेळ गेला हे त्याला कळलंच नाही, आणि जाण्यासाठी आवरू लागला. तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. फोन उचलत समीर काम करु लागला.
“हा बोल आकाश !!”
“अरे कुठे आहे सम्या तू !!”
“अरे आवरतोच आहे !! पाच मिनिटं फक्त !! “
“लवकर आवर !! तुझ्या बिल्डिंग खाली थांबलोय !! “
“अरे आलो !! आलोच !! “
समीर लगबगीने आवरातो. आणि पटकन आवरून खाली जातो. समोर आकाश कित्येक वेळ झालं येऊन थांबला होता.
“काय सम्या किती उशीर !! ” आकाश त्याला येताना पाहून म्हणतो.
“Sorry रे ..!! थोड लिहित बसलो आणि मग लक्षातच आल नाही वेळेचं !! “
“तू पण ना !! ” आकाश कार मध्ये बसतं म्हणतो.
दोघेही आता कारमध्ये बसून निघतात. कारमध्ये बसल्या नंतर आकाश बोलू लागतो.
” सम्या आज कोण येणार आहे माहित आहे का !! सायली देशमुख !! तुला सांगतो !! जाम फिदा होतो रे कॉलेज मध्ये असताना मी !!तुला तर सगळं माहितीच रे !!! पण तिने त्या कान्याशी लग्न केलं . वाटलं नव्हतं बर कान्या बद्दल !! डिग्री आणि पोरगी दोन्ही घेऊन गेला !! ” आकाश समीरकडे पाहून बोलायचं थांबला. त्याच लक्ष आपल्या बोलण्याकडे नाही हे त्याला कळलं.
” ये सम्या !! अरे लक्ष कुठ आहे ?? “
” कुठ नाही बोल ना !! “
“कसला एवढा विचार करतोय रे ??”
“काही नाही रे असच !!”
“दोस्त आहे मी तुझा साल्या !! मला वाटलं होतं आता बोलशील नंतर बोलशील पण नाही !! त्रिशाचा विचार करतोयस ना ??”
“नाही रे !! खरंच नाही !! “
” हे बघ !! सगळ्यापासून लपव पण माझ्या समोर नकोसं नाटक करू !!तुझा चेहराच सांगतोय सगळं !! सांग आता !!”
“खरंच काही नाहीरे तस !! ” समीर आकाशकडे पाहत म्हणाला.
“सांग!!”आकाश नजर रोखून त्याला म्हणाला.
“काय बोलू खरंच काही कळत नाही रे !! जिच्यावर मनापासून प्रेम केलं, ती आज कित्येक वर्षांनंतर पुन्हा समोर येणार !! हा विचारच सहन होत नाही रे !! एक मन म्हणत की पुन्हा कशाला तेच, आणि दुसरं म्हणत की भेट तरी एकदा !! पण यांच्या गोंधळात मला काहीच कळत नाही !! कशी असेल , कुठे होती , आता ती खुश आहे की नाही ! आणि असेल तर पुन्हा तेच आठवून कशाला द्यायचं !! काहीच कळत नाही !! तू म्हटल्या पासून काहीच सुचत नाहीये !! एवढं लिहिणारा मी पण त्रिशा समोर असेल तर शांत होतो.!! ” समीर अगदी मनातलं बोलत होता.
“पण तू असा विचार करूच नकोस की ती आता कशी असेल वैगेरे !! ती येणार आहे की नाही तेही नीटसं बाकीच्यांनी मला सांगितलं नाही !! पण मला वाटतं जरी ती आली तरी तू तिला मनमोकळ बोलावंसं .!! कोणताही राग किंवा पूर्वीच काही मनात ठेवून नाही !!!आणि तू तर प्रेम केलंस ना तिच्यावर !! मग तर सोड ना यार !! ती खुश असेल तर आपणही खुश व्हायचं !! आणि दुखी असेल अस आपणच नाही विचार करायचा.!!”
“एवढं सहज आहे हे !!”
“नसलं तरी आपण करायचं !! मनाला कधी कधी फसवण्यात पण वेगळंच सुख असतं रे !! “
समीर पुढे काहीच बोलला नाही आणि कारमध्ये फक्त गाणं वाजत राहिलं. दोघेही get-together जिथे होणार होत तिथे येऊन पोहचले. त्यांच्या अगोदर थोडेफार मित्र तिथे आले होते. समीर आणि आकाशाला पाहून सगळे खुश झाले. एकमेकांना भेटू लागले
“अरे यार !! मन्या कसा आहेस यार !! ” समीर त्याला मिठी मारत बोलू लागला. आकाशही तसाच भेटला. जुन्या मित्रांना भेटून दोघेही हरवून गेले. पण समीरची नजर इकडे तिकडे फिरत होती. त्या सर्वांत त्रिशा कुठेच नव्हती.सगळ्यांच्या भेटी झाल्या कित्येक वेळ निघून गेला तरी ती आलीच नाही. आकाश समीरची तिला भेटण्याची तळमळ पाहत होता.
“सगळे आले का रे ??” आकाश दुसऱ्या एका मित्राला मुद्दामच विचारतं होता.
“हो आले ना !! “
“खरं ??” आकाश तोंड वाकड करून म्हणाला. कारण सायलीही अजुन आली नव्हती.
“अरे नाही यार !! अजुन त्रिशा नाही , सायली नाही !! ओंक्या सुधा आला नाही अजुन !! “
” सायली , त्रिशा येतो म्हणाल्या होत्या ??”
“Confirm नाही म्हणे काही !!म्हणून तर सगळे आलेच म्हणायचं ..!! “
एवढं सगळं विचारून झाल्यावर. अचानक तो मित्र बोलला.
“अरे आल्याचं त्या !! त्या बघ !! “
समीर ते ऐकतो आणि मागे पाहतो. तर त्रिशा समोरून येत होती. तिला कित्येक वर्षांनंतर पाहून तो एका क्षणात स्वतःतच हरवला.
” कित्येक वर्ष लोटली तरीही आज सुद्धा त्रिशा तशीच आहे !! ते लांब केस, ते डोळे तशेच अगदी मनातलं बोलणारे !! बदलं असा काहीच वाटत नाही !! अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला पाहिलं होत तसचं आजही वाटतंय !! होणं!! पण …”
समीर भानावर आला. आणि नजर चुकवून दुसऱ्या मित्रांना भेटायला गेला.