प्रत्येक पाऊल ध्येयाच्या वाटेवरती असताना .!!तू किती वेळा पडलास !!! याचा विचार करू नकोस .!! किती वेळा उभा राहिलास याचाही विचार करू नकोस ..!! चालणाऱ्या मार्गावरती कुठे कोणासाठी थांबत बसू नकोस ..!!! कोण काय म्हणत आहे..!!! हे ऐकत बसू नकोस !!! …
लक्षात ठेव ..!! तुझे प्रत्येक पाऊल त्या ध्येयाकडे जाणारचं असायला हवं !!! ….. हा येतील कित्येक अडथळे ..!! पण त्यांना पार करायलाच हवं !!! यशाची गोडी चाखायची असेल, तर थोडं कठोर व्हायलाचं हवं ..!!..
कारणं. .. त्या ध्येयाच्या मार्गावर चालणारे आपण एकटे कधीच नसतो ..!!
आपल्या सारखा प्रयत्न करणारा नक्कीच कोणीतरी असतो .. आपल्या सारखी स्वप्न पाहणारा नक्कीच कुठेतरी प्रयत्न करत असतो … म्हणूनच आपण जिथे थांबू तिथेच कोणी आपल्या पुढे निघून जाऊ शकत .. ! जे आपल्याला हवं ते दुसऱ्याला मिळू शकत ..!! …
मग .. तेव्हा मनात एवढाच विचार येईल ..!! की थोडा अजून प्रयत्न केला असता..!!तर आज कदाचित वेगळं पाहता येईल ..!! … पण तो फक्त एकच विचार येऊ जाईल !! की थोडा अजून प्रयत्न केला असता तर .?? !! फक्त एक विचार आयुष्य बदलून जाईल .. !!!….
म्हणूनच इथे कोणतीही कारण नको .!!! इथे फक्त लढण्याची ताकद हवी..!! इथे हात बांधून बसणं नको …!! दोन्ही हात खोलून प्रयत्नांची पराकाष्ठा हवी..!!! कारण ..
इथ फक्त लढायच आहे !!
इथ फक्त जिंकायचं आहे ..!!
ध्येय आपलं मिळवायचं ..!
थोड गमावयाच आहे.!!
आणि खूप काही मिळवायचं आहे !!
हो !! याच रस्त्यावर चालायचं आहे !!
जिथे कोणतही कारण नाही ..!
हारण्याची भीती मनात नाही...!!
बस सर्व ताकदीने उठायचं !! आणि जिंकायचं आहे !!
इथे आपणच आपल्याला शोधायचं आहे !! .. कारण ..
"पडणाऱ्यास हसतात सारे उगाच खचून जाऊ नकोस!! जगा वेगळे चालताना मग भीती कोणती बाळगू नकोस!! अरे बोलू दे बोलणाऱ्यास तू त्यांचं ऐकत बसू नकोस!! घे मशाल हाती नव्याने आता कुठे थांबत बसू नकोस!! कैक दगड लागतील पायास विचार तू तुझा बदलू नकोस!! ध्येयाच्या या वाटेवरती आता आता डगमगून जाऊ नकोस!! कसे, कुठे कधी नी काय याचा विचार करत राहू नकोस!! यशाच्या जवळ जाण्यास आता वाट कोणाची पाहत थांबू नकोस!! जिंकलो, हरलो यात उगाच स्वतःस तु गुंतवून घेऊ नकोस!! जिद्द , चिकाटी प्रयत्न यात कुठेच कमी पडू नकोस!! मार्ग एक, ध्येय एक दुसरा विचार कोणता करू नकोस!! उठ !! लढ , धावत जा ध्येयाकडे !!! ही आग मनातली विजवू नकोस ..!!" ✍️© योगेश खजानदार