भाग ५

“या चारही दिशा मला माझ्या सायली जवळ घेऊन जातील का ?? पण ती कुठे आहे हे कसे कळणार !! तिच्या घरी एकदा जाऊन पहावे का??!! पण मी तिला बोलू तरी काय ?? कोणत्या शब्दात तिची माफी मागू !! त्या प्रणयाच्या वेळी तुझ्या डोळ्यात जे प्रेम मला दिसले त्याची एक ठिणगी या हृदयात ही आहे हे मला आता पुरत कळून चुकलं आहे सायली !! थांब जरा !! नको जाऊस !! त्या ओठातून निघालेला तो पायलसाठीचा तो शब्द अखेर मला सत्य काय आहे हे सांगून गेला !! पायल आता भूतकाळ आहे !! पण मी त्याला विसरणार नाही !! कारण तीही माझी तितकीच गोड आठवण आहे !! आणि मला माहिती आहे तू मला त्या आठवणींन सहित स्विकारशील. नक्कीच !!!”

विशाल आता सायलीच्या घराजवळ आला होता. पण घराला कुलूप होत. शेजारच्या काही लोकांना त्यांनी विचारलं तेव्हा ती कुठे गावाला गेली हे कळाल. तिचे आई बाबा तिच्या सोबत गेले हेही कळालं. विशाल दाही दिशा तिला शोधत होता.

“सायली , माझी सायली!! माझ्यावर प्रेम असुनही पायलला हसत हसत स्वीकारलं. कधी कळुही दिलं नाही, की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे. पायल गेल्यावर ही तिने नेहमी मला सांभाळून घेतलं. माझी विद्यार्थीनी म्हणून राहिली. कदाचित सतत माझ्या सोबत राहण्यासाठी.” विशाल डोळ्यात आलेला एक अश्रू पुसतो.

अचानक त्याची नजर समोर कडीला लावून ठेवलेल्या चिठ्ठीकडे जाते. चिठ्ठी घेऊन तो वाचू लागतो.

प्रिय विशाल,

मला माहिती आहे तू नक्की मला शोधत येणार!! झालेल्या चुकीची माफी मागायला येणार !! तुझ्या आयुष्यात पायल जशी महत्त्वाची आहे, तसचं माझ्या आयुष्यात तूही तितकाच महत्त्वाचा आहेस. आणि तुला अजुन दुःख देण्याचं माझ्यात धाडस नाही. त्या दिवशी आणावधनाने घडलेल्या त्या प्रणयात ना माझी चूक होती ना तुझी होती!! ती चूक त्या वेळेची होती. पण मला माफ कर, मी पुन्हा कधी तुझ्या आयुष्यात येणार नाही. तुझ्या आणि पायल मध्ये मी कधीच येणार नाही. फक्त तू आनंदी राहा. माझंही सुख यातच आहे. जमल्यास मला माफ कर!!

तुझीच सायली.

पत्र वाचून विशाल क्षणभर शांत राहिला. त्याला काहीच सुचेना. समोरच्या ओट्यावर तो कित्येक वेळ बसून राहिला. नंतर अचानक जागेवरून उठला आणि त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊ लागला.

“ये सुमित !! सांग ना रे !! सायली कुठे जाणार होती तुला काही सांगितलं का रे ??”
“खरंच नाही सर !! मला ती काहीच म्हणाली नाही.”

हताश होऊन विशाल घरी जाऊ लागला. मनात विचारांचं अक्षरशः एकमेकांशी द्वंद्व सुरू झालं होत.

“अखेर मी तिला गमावलच ना ?? माझ्यावर माझ्या नकळत प्रेम करणाऱ्या त्या सायलीला मी गमावलं !! जी अस्तित्वातच नाही !! जिला जाऊन दोन वर्ष झाली तिच्या आठवणीत मी आज माझ्या प्रत्येक दुःखात माझ्या जवळ असणाऱ्या, माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सायलीला गमावून बसलो. तिचं ते सतत माझ्याकडे येणं!! मला सांभाळून घेणं !! मला माझ्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करणं !! आज मला त्या गोष्टींची खरंच जाणीव होत आहे!! होणं ?? माणूस आपल्यापासून दूर गेल्यावरच आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव का व्हावी ?? जेव्हा जवळ असतात तेव्हा आपण दुसऱ्याच जगात जगत असतो!! आणि मग अचानक अस्तित्वाची जाणीव होते आणि सगळं पुसून जात !!!”

विशाल हताश होऊन घरा जवळ येतो. विचार करत करत मुख्य दरवाज्यातून आत येतो आई , सदा समोरच उभे असतात.

“काय झालं विशाल ?? आणि सायलीला शोधायला का गेला होतास ??”
“कारण मला माझी चूक कळली आहे आई !! सायली माझ्यावर मनापासून प्रेम करते ! आणि ती दूर निघून गेल्यावर माझ्याही मनात तिच्याबद्दल किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली!!” विशाल समोरच्या खुर्चीवर बसून बोलतो.
“मग भेटली नाही का ती??” आई मध्येच बोलते.
“खूप शोधलं मी तिला !! पण ती कुठेच नाही !!”
“तिचे आई बाबा ?? मित्र ??त्यांना विचारायचं !!”
“घराला कुलूप होत!! मित्रांना विचारलं तर कोणालाच काही माहीत नव्हतं !!”
“दादा !! चहा देऊ का ?जरा बरं वाटेल तुम्हाला “
” नको सदा !! काही सुद्धा खायची, प्यायची इच्छा नाहीये आता !!”
“मी केलेला चहा सुद्धा ??” मध्येच कोणीतरी बोललं.

आवाज ओळखीचा वाटतो म्हणून विशाल पाहतो. ती सायली होती. तिच्या हातातला कप घेत त्याला काय बोलावं कळतंच नव्हतं. तो फक्त पाहत राहिला.कित्येक वेळ.

“सायली ?? तू आणि इथे ???”
“सकाळीच आले मी इथे !!तुम्ही झोपला होतात म्हणून मग आई जवळ बसले होते!!”
“आणि मग ते पत्र ???” विशाल कुतूहलाने विचारतो.
“ते सगळं माझं काम होत !!” आई मध्येच बोलते.
“पण का ?? “
“कारण तुला आपल्या जवळच्या माणसाची जाणीव करून देण्यासाठी!! “
विशाल आईकडे पाहत राहतो. आई बोलत राहते.
“सायली येऊन गेल्यावर तुझ्यात झालेला बदल मला नक्कीच नवी दिशा देऊन गेला. तेव्हा मी सायलीला या विषयी बोलले!! तिने मला सगळं सांगितलं !! तुझ्या मनात पायल किती रुतून बसली आहे!! हेही तिने मला सांगितलं !! तेव्हा मीच तिला सांगितलं!! मी सांगेन तोपर्यंत विशाल समोर तू यायचं नाही!! तुझं प्रेम त्याला कळायची गरज होती!! आणि तेच मी केलं !! विरह माणसाला अजुन जवळ आणतो हे खरं आहे !! पण एखाद्याच्या विरहात संपूर्ण आयुष्य विसरून गेलो तर जवळ असलेले, आपल्यावर तितकंच प्रेम करत असलेले लोक आपल्या पासून दुरावतात!! हेच मला तुला यातून सांगायचं होत!! पायलची जागा कोणी घेऊ शकत नाही !! पण विशाल सायलीची जागाही कोणी घेऊ शकत नाही !!!” आई मनापासून बोलली. कित्येक दिवस विशालला बोलायचे होते हे तिला.
“खरं आहे आई !! मला माझी चूक कळली आहे !! आणि मला ती सुधारावी लागणार हेही मला माहित आहे!! पण सायली मला माफ करेन ???” विशाल सायलीकडे पाहत म्हणाला.
सायली क्षणभर शांत राहिली. सगळे तिच्याकडे पाहू लागले. तेव्हा नकळत ती लाजली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हसू उमटले. आई आपल्या खोलीत निघून गेली. सदा आपल्या कामात गुंग झाला. समोर होते फक्त सायली आणि विशाल.

कित्येक वेळ दोघे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. सायली गालातल्या गालात लाजली. विशाल तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला.
“माझ्यावर इतकं प्रेम करतेस तू ??” विशाल अचानक बोलला.
सायली नकारार्थी मान हलवत त्याच्यापासून दूर जाते.
“सांग ना ?? “
“माहित नाही !! पण ओठांच्या शब्दांना फक्त तूच माहित आहेस !! नजरेच्या त्या पापण्यात तुझीच आठवण ठेवली आहे !!” सायली विशालकडे पाहत म्हणाली.
“मी पायलच्या आठवणीत वेडा होतो तेव्हाही ??”
“हो तेव्हाही !!”
“पण का ??”
“कारण माझ्या प्रेमाला कोणतंच बंधन नव्हतं !! ना विचारांचं द्वंद्व होत !! ते नितांत आहे !! तू सोबत असावा एवढीच त्यात मागणी आहे !! तू मिठीत यावा अस नेहमी वाटलं पण हट्ट त्यात कधीच नव्हता!! ” सायली मनातलं सांगत होती.
“आय लव्ह यू सायली!!” विशाल तिला मिठीत घेत म्हणाला.
“माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस !! तुझ्या आठवणीत मी क्षण न क्षण तुला शोधलं आहे !!! तुझ्या रितेपणाची जाणीव खूप वाईट आहे !!नाही ना जाणार ??” विशाल सायालीकडे पाहत म्हणाला.

सायली फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्या ओठांवर पुन्हा कित्येक प्रेमाचे मधुर रस रिते झाले. दोघेही एकमेकात मिसळून गेले, गुंतून गेले.

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!
रिते करावे भाव मनीचे!!
पण अश्रूंची ती वेगळी तऱ्हा!!

नजरेतूनी पाहता आज तुला!!
कवितेत लिहिले मीच मला !!
शोधून पाहिले माझ्यात तुला!!
पण सापडलो ना मीच मला !!

सांग ते प्रेम कळले ना तुला!!
सांगूनही कळले ना मला !!
आठवांचे द्वंद्व असे की
तुझ्याविना सोबती ना मला !!!

सांगावी ती ओढ तुला !!
पण शब्द न सापडे आज मला !!!”

विशाल आणि सायली खोलीत कित्येक वेळ समोरच्या चित्रात स्वतःला शोधत राहिले. आपले प्रेम व्यक्त करत राहिले.

समाप्त

✍️ योगेश

स्मशान …(शेवट भाग)

आयुष्यभर जगण्यासाठी क्षण न क्षण जळत राहायचं !! कशासाठी ?? अखेर राख होऊन धगधगत राहण्यासाठी ?? परवा हा…
Read More

नकळत (कथा भाग १) || LOVE STORIES ||

आयुष्यातून ती निघून गेल्यानंतर काहीच उरलं नव्हतं. राहिला होता तो फक्त माझा एकांत आणि मी. मनाला सांगि…
Read More

मास्तर || MARATHI SHORT STORIES ||

“गुरुजी!” मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली. गुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्या…
Read More

अंतर ( PART 1) || MARATHI LOVE STORY ||

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच र…
Read More

Comments are closed.

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.