भाग ३

विशालच्या खोलीतून बाहेर येताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जणू ते तिला खूप काही बोलत होते. रात्रभर ती अंगणातल्या खुर्चीवर बसून राहिली. विशाल आणि त्याच्या या वागण्याबद्दल तिच्या मनात कित्येक विचार येऊ लागले.तिच्या मनात सदाचे ते वाक्य सारखे घुमू लागले.

“बाईसाहेब !! विशाल दादांना आपण वैद्यबुवांना दाखवू या ??” पण क्षणात आई भानावर येत होती. तिला विशालचे हे वागणे आता विचित्र वाटायला लागले होते.

“जी आता अस्तित्वात नाही तीच नसणं अमान्य करणं, याला काय म्हणावं तेच कळतं नाही. का ती फक्त आपणच आपल्याशी केलेली फसवणूक आहे ?? माहित नाही !! पण याची नक्कीच किंमत आपल्याला मोजावी लागते, हो ना?? विशालच्या बाबतीत ती किंमत कदाचित सायली तर नसेल ना ?? तीच आता त्याला या भूतकाळाच्या जाळ्यातून बाहेर काढू शकेल !! तीच नितांत प्रेम आहे विशालवर !!”

विचारांच्या तंद्रीत सकाळ केव्हा झाली कळलच नाही. खुर्चीवर विचार करत करत झोपी गेलेल्या आईकडे पाहून सदाने आईला जाग करण्यासाठी हाक मारली.

“बाईसाहेब !! बाईसाहेब !!”
झोपितून जागे होत, आई समोर उभ्या सदाला पाहू लागली. सदा पुढे बोलू लागला.

“बाईसाहेब !! रात्रभर तुम्ही इथेच झोपलाय होय ?? खोलीत तरी जायचं !!!”
“नाहीरे सदा !! बसल्या बसल्या कधी झोप लागली कळलच नाही !!” आई खुर्चीवरून उठत म्हणाली.
“चहा आणू??”सदा आईकडे पाहत म्हणाला.
“हो आन!! मी आवरते तोपर्यंत !! काय रे सदा !! विशाल उठला का रे ???”
“केव्हाच उठून बसले आहेत दादा !! आवरून पण झालं !! कुठ बाहेर जायच्या तयारीत आहेत वाटत!!”
“नेहमीचच रे ! पायलला आणायला जायचा हट्ट !! दुसरं काय !!” आई आपल्या खोली जात म्हणाली.

इकडे विशाल आवरून बाहेर जाण्याच्या तयारीत होता. मध्येच सदाला हाक मारत होता.
“ये सदा ! इकडे ये रे !चहा घेऊन ये !”

लांबुनच सदा येतो म्हणून विशालला सांगत होता. तेवढ्यात मुख्य दरवाज्यातून सायली आत येत होती. सदा तिला पाहून म्हणाला.

“अरे !सायली !! ये न !! “
“सर आहेत ??”
“हो आहेत !! खोलीत आहेत !!”
“चहा मी घेऊन जाऊ !” सदाच्या हातातला चहा पाहून सायली म्हणते.
“ठीक आहे !!” सदा चहाचा कप हातात देत म्हणाला.

सायली चहा घेऊन खोलीत येते. विशाल समोर उभा असतो. तिला पाहून विशाल म्हणतो.
“सायली तू !! आणि आता ???”
“आज वर्ग आहेत सर !!” चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाली.
“हो मग एकटीच ??” विशाल चहा पित म्हणाला.
“बाकीचे आज सगळे फिरायला गेले आहेत !! म्हणून मग एकटीच आले आज !!”
“चला बर झाल!! मलाही आता वेळ नाहीये !! आपण मी आल्यावर वर्ग सुरू करूयात !!” विशाल चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला.
“मला आहे ना वेळ !!” सायली अगदिक होत म्हणाली.
“हो पण मला नाहीये !!” विशाल एकदम बोलून गेला.

सायली क्षणभर शांत राहिली काहीच बोलली नाही. विशालच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिली. विशाल लगबगीने बाहेर जाऊन लागला आणि अचानक समोरच्या खुर्चीला अडकून पडणार तेवढ्यात, सायलीने त्याला सावरलं. तो तिच्या मिठीत केव्हा गेला त्यालाही कळलं नाही. तो स्पर्श तिच्या हातांचा त्याच्या हातावर जाणवू लागला होता. ती नजर त्या नजरेत हरवून गेली होती. सायली ही स्वतःला सांभाळू शकत नव्हती. कित्येक वेळ ते एकमेकांत हरवू गेले होते आणि नकळत ओठ ओठांवर स्पर्श करून गेले. तो स्पर्श खूप काही बोलत होता. सायली आणि विशाल आता एक झाले होते. आता विशालच्या त्या मिठीत सायली हरवून गेली, फक्त विशालची राहिली. विशाल बेधुंद होऊन तिच्या ओठांवर नकळत प्रेमाचे कित्येक गोड क्षण रिते करत होता. त्या सुखाच्या परमोच्च क्षणात कदाचित सायली आणि विशाल आता जणू भान हरपून गेले होते.

विशाल सायलीला घट्ट मिठीत घेऊन होता.
“माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे पायल !! मी तुझ्या शिवाय नाही राहू शकत !! “
विशालच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. सायली क्षणात भानावर आली. स्वतःला विशाल पासून दूर करत सावरू लागली.
“पायल !! माझी पायल !! तू आलीस !!” विशाल बोलत होता.
सायली फक्त पाहत राहिली. आता विशालही भानावर आला. त्याला काय झाले हे कळायच्या आत, सायली खोलीतून बाहेर निघून गेली.

दरवाज्यातून बाहेर जात अश्रू पुसत ती निघून जाऊ लागली. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. विशालही झाल्या प्रकारात स्वतःला शोधत होता.

“ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तो आज मला मिठीत घेताना खरंच किती आनंद झाला होता. ते सुख आयुष्यातील इतर सुखापेक्षा खूप सुंदर होत. पण त्या सुखात फक्त मी होते !! तो कुठेच नव्हता. तो होता फक्त शरीराने माझ्याजवळ!! पण मनाने तो आजही त्या पायलचां होता. मग मी त्याला उगाच का शोधत आहे?? मलाच कळतं नाहीये !! आजपर्यंत नितांत प्रेम केलं मी त्याच्यावर !! आज त्याच्या मिठीत असताना फक्त एकदा त्याच्या तोंडून माझं नाव यावं एवढंच वाटत होत मला, होना !!पण तीही इच्छा पूर्ण झाली नाही माझी!! कदाचित विशाल ही आजची आपली शेवटची भेट !! ” सायली विचाराच्या वादळात होती.

“आज मला हे काय झालं मलाच कळलं नाही !! ज्या सायलीला मी कधीही त्या नजरेने पाहिल नाही !! ती सायली आज माझ्या मिठीत होती. पण मी कुठे होतो. पायलच्या विश्वात मी हरवून गेलो होतो. काय वाटलं असेल सायलीला !! काय विचार करत असेल ती आता !माझी खूप मोठी चूक झाली!! ! नक्कीच !!” विशाल खुर्चीवर बसून विचारात गुंग होता.

आई कित्येक वेळ विशालची वाट पाहत होती. तिला मनातुन भीतीने ग्रासले होते. जेव्हा विशाल पायलला आणायला निघेल तेव्हा काय म्हणून मी त्याला आडवणार आहे माहीत नाही. पण दिवस मावळतीला आला तरी विशाल आपल्या खोलीतून बाहेर आलाच नाही. आईला आश्चर्य वाटत होत. ती न राहवून विशालच्या खोलीत गेली.

“विशाल !! ये विशाल !! “
स्वतःला सावरत विशाल खूर्चीवरून उठला आणि म्हणाला.
“हा आई !! ये ना !! “
“आज खोलीतून बाहेरच आला नाहीस??”
“हो ते जरा !! चित्र काढण्यात व्यस्त होतो.!!” विशाल तुटक बोलत होता.
“का रे काही झालं का??” आई म्हणाली.
“नाही ग आई !! मी ठीक आहे !!”
“बर बर !!”

आई एवढेच बोलून खोलीतून बाहेर आली. रात्री जेवतानाही विशालच लक्ष नव्हतं हे तिने ओळखलं होतं. पण कसे विचारावे म्हणून ती शांतच राहिली. जेवण करून विशाल पलंगावर पडून राहिला. कित्येक वेळ विचार करत राहिला.

विचार करता करता त्याला झोप कधी लागली हे त्यालाही कळल नव्हतं.

“थांब !! जाऊ नकोस !! थांब जाऊ नकोस !!! माझ्यापासून अस लांब जाऊ नकोस !! थांब !! तो जाणारा प्रत्येक पाऊल मला पुन्हा अंधारात घेऊन जाईल !! हे द्वंद्व मला पुरते हैराण करून सोडते आहे !! तुझा हात हाती दे माझ्या !! तुझा हात असाच राहू दे आता !!! सायली !!! या द्वंद्वा मधून सोडवं मला !! थांब सायली जाऊ नकोस !!!”

विशाल अचानक झोपेतून जागा झाला.

क्रमशः

✍️योगेश

READ MORE

शर्यत (कथा भाग ३) || Sharyat Marathi Story ||

शर्यत (कथा भाग ३) || Sharyat Marathi Story ||

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!" सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो. "साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!" सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. "पर…
शर्यत (कथा भाग २) ||Marathi Stories ||

शर्यत (कथा भाग २) ||Marathi Stories ||

"राम राम आप्पा !!" आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता. "सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!" "म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!" "हो रे !! बसला विश्वास !!" "मग द्या माझे उरलेले…
शर्यत !! (कथा भाग १) || MARATHI STORIES || KATHA ||

शर्यत !! (कथा भाग १) || MARATHI STORIES || KATHA ||

सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी…
द्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग

द्वंद्व (कथा भाग ५) शेवट भाग

विशालच सायलीला शोधायला जाणं. पण सायलीला शोधावं कुठं हा प्रश्न. मग आईच्या मनात नक्की काय होत?? आणि सायली अखेर भेटेल का विशालला ?? की पुन्हा विशालच प्रेम अधुरच राहील. नक्की वाचा शेवट भाग.
द्वंद्व (कथा भाग ४)

द्वंद्व (कथा भाग ४)

विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल वाटावं आणि अखेर भूतकाळ आणि वर्तमान यातून विशालने कोणास निवडाव?? कित्येक प्रश्न आणि फक्त प्रश्नच.
द्वंद्व (कथा भाग ३)

द्वंद्व (कथा भाग ३)

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.
द्वंद्व (कथा भाग २)

द्वंद्व (कथा भाग २)

विशालच्या समोर अचानक आलेली पायल हा त्याचा भास होता की सत्य? आईच्या मनातली विशाल बद्दलची खंत आणि एक निरागस प्रेम म्हणजे सायली.
विरोध ..(शेवट भाग)

विरोध ..(शेवट भाग)

शेवट भाग “प्रिती तुला माझ्याकडुन घटस्फोट हवाय !! हीच माझ्या प्रेमाची किँमत !! नाही प्रिती हे होणार नाही !! तुला मी माझ्यापासून दूर जावू देणार नाही !! बस्स !! आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझ प्रिती !! दहा वर्ष छळलस मला त्या अनिकेतच्या आठवणीत !! तुला तुझ प्रेम मिळालं !! तू त्याच्याकडे निघून जातेय !! खरतर…
विरोध ..(कथा भाग ५) || VIRODH MARATHI KATHA ||

विरोध ..(कथा भाग ५) || VIRODH MARATHI KATHA ||

भाग ५  अनिकेतलाही आता प्रितीच्या अश्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ लागला होता. प्रितीला थोड लांब करत तो तिला बोलू लागला. “पण मला तुला बोलायचं नाहीये प्रिती !! तुला कळत कस नाहीये की हे आता शक्य नाहीये !!! तुझ लग्न झालंय प्रिती !! आणि मीही माझ्या संसारात, आयुष्यात सुखी आहे !! “ “मग सोडून देऊयात हे सगळं…

Comments are closed.