भाग २
समोरच खुर्चीवर बसलेल्या आईने सायली खोलीतून बाहेर येताच प्रश्न विचारला.
“सायली!! चाललीस ??”
“हो आई !! येते मी !! सर आपल्या कामात गुंग झालेत !! आणि मला ना आता कंटाळा आलाय !!”
“हो का !! असंच आहे बघ विशालच !! एकदा चित्र काढण्यात गुंग झाला की काही कळत नाही त्याला !!”
“हो तर !!” सायली बाहेरच्या बाजूने जात म्हणाली.
“बरं येते मी ! ” दरवाजा बाहेर जात सायली म्हणाली.
सायलील लांब जाताना आई कित्येक वेळ पाहत राहिली. मनात कित्येक विचार तिच्या येत होते.
“सायली म्हणजे आमच्या पेंडसे मास्तरांची पोर !! गोड सालस !! तिचा विशालवर पहिल्यापासून जीव !! तशी ती वयाने विशाल पेक्षा जेमतेम एक दोन वर्षांनीच लहान असेल !! पण ती नेहमी राहिली ती विशालची विद्यार्थीनींच !! कारण विशालच्या जवळ राहण्यासाठीचा एक केविलवाणा प्रयत्न आहे तो!! कधी कधी मला खरंच नवल वाटत तीच !! विशाल बद्दल एवढं सगळं माहीत असूनही ती आजही विशालवर तितकंच प्रेम करते!! अगदी मनापासून !!!” आई सायलीच्या विचारात गुंग झाली होती.
आतमध्ये खोलीत विशाल चित्र काढण्यात अगदी स्वतःला विसरून गेला होता.
“विशाल !!”. एक अनामिक आवाज मागून त्याला आला.
“कोण ??” विशाल मागे वळून पाहू लागला.
“मी आहे !! तुझी सखी , सोबती .. !!
विशाल क्षणभर गोंधळून गेला. त्याला काय बोलावं काहीच कळेना. समोर कोण आहे याचा त्याला विश्वासाचं बसेना.
“तू !! तू!! पायल !! तू !!!”
“हो !! मी आले आहे विशाल !! तुझ्या जवळ!! अगदी कायमची !!”
विशालच्या हातातील चित्र काढण्याचा ब्रश खाली पडला. तो क्षणभर शांत झाला. त्याला जणू चित्रातली त्याची सखी प्रत्यक्षात समोर आल्या सारखे वाटू लागले.
“कुठे होतीस तू ??दोन वर्ष !! दोन वर्ष मी तुझी किती वाट पाहिली माहिती आहे ??”
“म्हणून तर मी आले ना !! तुला भेटायला !! तुझ्या कुशीत यायला !! तुझ्या मिठीत सामावून जायला !!”
“येना !! पायल !! माझ्या मिठीत ये !! तुझ्याविना हे जग सार मला अगदी फिक वाटायला लागलं होत!!” विशाल अधीर होऊन बोलू लागला.
“हो ना ! माझीही अवस्था काही वेगळी नव्हती विशाल !! हे सारं जग मला तुझ्याविना अगदी उदास वाटत होत रे !!”
“होका !! मग का राहिलीस माझ्यापासून दूर इतकी तू ??का?? सांग ना ??”
“माझा नाईलाज होता रे विशाल !! माझा नाईलाज होता !! “
“आता तर नाहीना सोडून जाणार मला तू ??”
“नाही कधीच नाही रे !!”
विशाल हळू हळू पुढे जाऊ लागला. तशी ती त्याच्या पासून दूर जाऊ लागली.
“ये पायल!! माझ्या जवळ ये!! या माझ्या हृदयाला तुझ्या प्रेमाची ओढ लागली आहे !! येणा !”
“विशाल मी मजबूर आहे रे !!”
“कोणती अशी मजबुरी आहे सांग तरी ??” विशाल थोडा मोठ्या आवाजात बोलू लागला.
“नाही रे !! मी नाही सांगू शकत !! “
“तुला सांगाव लागेन !!”
“मला माफ कर !!” पायल मध्येच बोलत होती.
“तुझं माझ्यावर प्रेम नाही !!” विशाल डोळ्यातून येणाऱ्या अश्रुस पुसत म्हणाला.
“अस नाही रे ! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे !!!” असे म्हणताच ती मागे मागे जाऊ लागली.
“मग मला सोडून जाऊ नकोस!!” विशाल विनवणी करू लागला.
“माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे!!” पायल आता एवढंच बोलू लागली.
“नाही नाही !! तुझं माझ्यावर प्रेम नाही !! मला सोडून जाऊ नकोस पायल!!”
विशाल हळू हळू पुढे येऊ लागला. पायल मागे मागे जात असल्याचे त्याला वाटले.
“मला सोडून जाऊन नकोस पायल!! ” विशाल मोठ्याने ओरडत दरवाजाकडे धावत जाऊ लागला.
“पायल पुढे पुढे निघून जात आहे!! मला तिला अडवल पाहिजे !! आता पुन्हा तिला मी माझ्या आयुष्यातून जाऊ देणार नाही !!!पायल !!”
विशालच्या आवाजाने आई भानावर आली. आतमध्ये सदा काम करत असलेला धावत बाहेर आला. बाहेर पळत चाललेल्या विशालला त्याने अडवल.
“कुठे जाताय विशाल दादा !!”
“सोड मला सदा !! पायल निघून जाते आहे !! मला तिला आडवयाला पाहिजे !!!”
आई लगबगीने विशाल जवळ आली.त्याला सावरत म्हणाली.
“कोणी नाहीये विशाल तिथे !! शुध्दीवर ये विशाल !! कोणी नाहीये !!”
“आई पायल जाते आहे !! तिला थांबवना !! तिला जाऊ देऊ नकोस !! “
“अरे जी या जगातच नाही ती पुन्हा कशी येईल विशाल !! भानावर ये रे !! सत्य स्वीकार आता तरी !!”
“काहीतरी काय म्हणतेस आई !! आत्ता माझ्या समोर होती ती !! “
“तो तुझा भास होता !!” आई विशालला सावरू लागली.
“चला खोलीत दादा !! चला !! आहो कोणी नाहीये इथ !!”
कित्येक वेळ समजावून सांगितल्या नंतर विशाल आपल्या खोलीत गेला. विचार करत बसला हा भास होता की सत्य. आई विशालच्या या वागण्याने हतबल झाली. विशालला खोलीत व्यवस्थित सोडून सदा पुन्हा आईकडे आला.
“बाईसाहेब !! एक बोलू !!”सदा आईच्या समोर येत म्हणाला.
“बोल ना सदा !!”
“म्हणजे !! राग येणार नसेल, तर बोलतो !!”
“नाही येणार बोल !!” आई डोळ्यात आलेले पाणी पुसत म्हणाली.
“आपण विशाल दादाला एखाद्या वैद्यांकडे दाखवूयात का ??”
“म्हणजे तुला म्हणायचं आहे ! विशालला वेड लागलंय??”
“नाही !! तसं नव्हतं म्हणायचं मला !! पण त्यांची ही अवस्था बघवत नाही आता !!”
“मलाही आजचं त्याच वागणं पाहून काय बोलावं काहीच कळत नाहीये !! “आई अगदिक होऊन म्हणाली.
“माफ करा बाईसाहेब !!”
“नाही रे सदा !! तू सुधा त्याच्या चांगल्यासाठी म्हणालास !!”
आई आणि सदा कित्येक वेळ बोलत राहिले. त्यांना आजच्या विशालच्या वागण्याने काय करावे काहीच कळतं नव्हतं. तेवढ्यात विशालच्या खोलीतून आवाज येतो.
“सदा !! ये सदा !! इकडे ये!!”
सदा लगबगीने जाऊ लागला. पण त्याला थांबायला सांगून आई विशालच्या खोलीत गेली. विशालच्या समोर जात बोलू लागली
“काय झालं विशाल ??”
“डोकं खूप दुखतंय आई ! चहा हवा होता !!!”
“ठीक आहे मी सांगते सदा ला !! “
अस म्हणत आईने हाक मारून सदाला चहा घेऊन यायला सांगितलं.
“काय रे विशाल !! एवढी चित्र काढतोस !! मोठ मोठे त्यांचे प्रदर्शन भरवतोस !! पैसा एवढा कमावतो !! मग कधी एखाद माझं आणि तुझ्या बाबांचं चित्र काढलास का रे ??”
“हो मग !! काढलं ना !! “
“दाखवतोस ??” आई त्याला आग्रह करते.
“थांब !! ” विशाल त्याच्या कित्येक चित्रातून ते एक चित्र शोधू लागला. चित्र मिळताच ते आईला दाखवू लागला.
“खूप छान आहे ना !! केव्हा काढलस !! कधी कळू पण दिलं नाहीस !!”
“बाबा जायच्या काही दिवसांपूर्वी काढलं होत !!”
“किती वर्ष झालीना बाबांना जाऊन !! “
“पंधरा वर्ष !” विशाल आई जवळ बसत म्हणाला.
“पण बघ ना !!आजही मला ते माझ्या सोबत आहेत असच वाटत!! अगदी या चित्रातल्या रंगाप्रमाने !! जिवंत !! माझ्या आठवणीत !! माझ्या श्वासात !पण हा भुतकाळ झाला!! त्यांचं अस्तित्व आहे आठवणीत !! हृदयात !! “
“होणं!! आजही ते आपल्यात असल्या सारखेच वाटतात!!” विशाल आईला मिठी मारत म्हणाला.
“आयुष्य यालाच म्हणावं विशाल !! जो गेला तो आठवणीत असतोच !! जात कधीच नाही !! म्हणून काही भूतकाळाला आपल्या वर्तमान काळावर वर्चस्व गाजवू द्यायचं नाही !! हो !!जावं कधी त्या भूतकाळात हरवून !! पण काही क्षणा पुरतच !!”
“हो !! कळतंय मला आई !तुझ्या आयुष्यात बाबांच्या आठवणी नेहमीच जिवंत असतात !! जश्या माझ्या मनात पायलच्या !! ती पुन्हा परत आली की सारं काही पहिल्या सारखं होऊन जाईल !!” विशाल त्याने काढलेल्या चित्राकडे पाहत म्हणाला.
“बाळा !! भूतकाळाला वर्तमान काळावर वर्चस्व गाजवू देऊ नकोस !!” आई अगदिक होऊन पुन्हा बोलू लागली.
“पण आई माझं भूत , भविष्य आणि वर्तमान एकच आहे !!” विशाल मध्येच म्हणाला.
आई क्षणभर शांत राहिली. काहीच न बोलता ती खोलीतून बाहेर निघून जाऊ लागली.तिला जाताना पाहून विशाल पुन्हा बोलला.
“आई !! मला पायलला आणायला जायचं आहे !! जर तुझी परवानगी असेल तर !!”
“अरे पण उद्या तुझे वर्ग आहेत ना ??”
“ते जाऊदे ग आई , सायलीला सांगेन मी काहीतरी !! उद्या मला पायलला आणायला जायची परवानगी देशील??”
“ठीक आहे जा तू उद्या !! पण शांत झोप आता !!”