भाग १

प्रिय पायल,

प्रत्येक क्षणात जेव्हा आपण आपल्या माणसाला शोधायला लागतो ना तेव्हा त्याचं नसण मनाला खूप वेदना देत. आज पुरती दोन वर्ष झाली तुला माझ्यापासून दूर जाऊन पण तरीही तू परत येत नाहीस. तुला कित्येक वेळा पत्र लिहिली मी, पण एकाही पत्राच तू साधं उत्तरही दिलं नाहीस. पण तरीही मी हा पत्र प्रपंच करत राहीन. अगदी शेवट पर्यंत!! माझ्या विना एक क्षणही न राहू शकणारी तू आज दोन वर्ष माझ्या शिवाय राहते आहेस.तुला माझी एकदाही आठवण आली नाही?? सांग ना ?? एकदा ही नाही !! पण माझे प्रत्येक क्षण तुझी आठवण काढल्या शिवाय राहत नाहीत. कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि तुझ्याकडे यावं, एक दोन वेळा प्रयत्न केलाही मी, पण आईच्या वचनात मी गुंतून गेलो. कारण तू पुन्हा नक्की येणार याचा तिलाही तेवढाच विश्वास आहे. पण आता माझ्या आठवांचा बांध फुटेन की काय असे वाटू लागले आहे.यावेळी नक्की तू पत्राच उत्तर देशील याची मला खात्री आहे. तुझ्या पत्राची वाट पाहतोय. तुझ्या येण्याची वाट पाहतोय. माझ्या चित्रात पुन्हा तुझे रंग भरण्याची वाट पाहातोय.

तुझाच विशाल.

कित्येक वेळ मनातलं कागदावर लिहीत बसलेला विशाल अखेर थांबला. कागदावरती लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचू लागला. वाचता वाचता त्याने मोठ्याने हाक मारली.
“सदा !! ये सदा ! “
लांबून लगबगीने सदा चालत आला. केस पिकलेले, डाव्या खाद्यावर गमजा,पांढर धोतर घातलेला तो सदा, आपल्या हातातले काम बाजूला ठेवून स्वतःला सावरत आला, बोलू लागला.
“बोला विशाल दादा !! काय काम आहे !!”
” हे पत्र तेवढं पोस्टात टाकं बर !! आणि आजची आज टाकं !!”
क्षणभर सदा स्तब्ध उभा राहिला. काहीच बोलला नाही अखेर त्याच्याकडे पाहून विशाल पुन्हा बोलला,
“काय म्हणतोय मी सदा !! एकातोयस ना ??”
सदा भानावर येत म्हणाला,
“आ !! हो !! हो !! आजची आज पोस्टात टाकतो !!
“नक्की टाकं !!”

होकारार्थी मान हलवत सदा बाहेर जाऊ लागला. समोर विशालची आई आपल्या कामात गुंग होती. सदा आईच्या जवळ गेला आणि म्हणाला.

“बाईसाहेब !! “
आई वर पाहत बोलली.
“काय झाल सदा ??”
सदाने पत्र पुढे केले.
पत्र पाहताच आईने हातातले काम तसेच ठेवले, पत्राकडे पाहून बोलू लागली.
“आज पुन्हा पत्र लिहिलं विशालने!!”
सदा फक्त पाहत राहिला. आई पुढे बोलू लागली,

“सदा तुला आठवत, विशाल आणि पायल यांचं थाटामाटात लग्न लावून देण्याचा किती हट्ट केला होता मी !!आणि तितक्या थाटात मी ते केलही ! पण तो थाट जास्त दिवस उरलाच नाही रे !! नजर लागावी तशी या गोड नात्याला नजर लागली. जीव तुटतो रे सदा विशालसाठी !! काय करावं काही कळत नाही !!”
“बाईसाहेब तूम्ही नका एवढं वाईट वाटून घेऊन !! हळू हळू विसरून जातील दादा सगळं !! थोडा धीर ठेवा !!” सदा आईला सावरायला सांगू लागला.
“याच तर एका आशेवर जगते आहे रे मी !! आणि त्याच्याशिवाय कोण !!आधार तरी कोण आहे माझा !!”आई डोळ्यातले अश्रू पुसत म्हणू लागली.
मागून विशाल केव्हा आला कळलच नाही, अचानक सदाला पाहून तो म्हणाला,

“तू गेला नाहीस अजून सदा ?? जा बर पत्र टाकून ये !! उशीर व्हायला नको !!”
“हो दादा !! जातोय मी !! “
सदा निघून गेला. आईच्या पदरा खाली ते पत्र तसेच राहिले.

“विशाल आज काय विशेष पत्राचं ??”
“काही नाही ग आई !! आज पायलला पत्र लिहिलं!! आज तिला माहेरी जाऊन पुरती दोन वर्ष झाली, पण तिचा पुन्हा इकडे यायचा काही निर्णय होत नाहीये !! आणि तिला आणायला जावं म्हटलं तर तू जाऊ देत नाहीयेस !! “
“अरे !! येईल ती मनाने म्हणून मी तुला जाऊ देत नाहीये !! “
“आई अस म्हणता म्हणता दोन वर्ष झाली !!”
“माहितेय रे मला !! पण मला वाटतं तू उगाच हट्ट करू नये तिला !! ती येईल तेव्हा येईन !!”
“तुझ्या शब्दांच्या बाहेर आहे का मी ?? तू म्हणशील तस !!” विशाल आईकडे हसत पाहत म्हणाला.

आईशी बोलून विशाल पुन्हा आपल्या खोलीत गेला. आई विशालकडे पाहून कित्येक विचारात गुंग झाली.

“माणूस इतका प्रेमात का गुंतून जातो की त्याला अस्तित्वाची जाणीव कधीच का होत नाही? जग ते फक्त तेवढंच राहत जेवढं ते स्वतः पाहत राहत. या जगात एकतर तो तरी असतो नाहीतर कोणीच नसतं. विशालच काहीस असच झालं आहे. त्याला अस्तित्वाची जाणीवच का होत नाहीये मला हेच कळत नाहीये. मलाच त्याला या दुनियेत पुन्हा आणावे लागेल का ?? माहित नाही !! पण हे भूतकाळाचे वर्तमान काळाशी असलेले द्वंद्व नक्की कोणाला जिंकू देईल हे तो क्षणच सांगेन !!”

“आई!!” अचानक कोणीतरी हाक मारली.
“कोण ??
“मी !! सायली !!”
“ये ना सायली !! बस !! ” आई स्वतःला सावरत म्हणाली.
“विशाल सर ??” सायली प्रश्नार्थक विचारू लागली.
“आहेत मी बोलावते त्यांना !! तू बस ना !”
“हो !! ” सायली समोरच्या बाकावर बसत म्हणाली.

आई लगबगीने आत गेली. विशालला सायली आल्याचं सांगितले. विशाल बाहेर येत म्हणाला.

“सायली आज तर आपला वर्ग आहे हे ठरलं नव्हतं ना ?? “
“ठरलं नव्हतं !! पण म्हटलं तुमच्याकडे जाऊन तुम्ही नवीन कोणती चित्र काढत आहात ते पाहत बसाव म्हणजे तेवढीच उजळणी पण होईन !!”
विशाल क्षणभर शांत राहिला. आणि म्हणाला,
“आज पुरते ठीक आहे पण रोज हे चालणार नाही !! मी दिलेल्या वेळेतच यावं लागेल !!

ती थोडी स्वतःला सावरणारी. थोडी लाजरी सायली काहीच बोलली नाही.

विशाल तिला आपल्या खोलीत घेऊन गेला. सगळीकडे कित्येक त्याने काढलेली चित्रे ठेवली होती. त्यांना पाहतच रहावं अस वाटत होत.

विशाल चित्र काढण्यात गुंग झाला. त्याला चित्र काढताना कित्येक वेळ सायली पाहू लागली आणि मध्येच बोलू लागली.

“सर !! मला काही विचारायचं आहे !! विचारू ??”
विशाल तिच्याकडे पाहत फक्त ‘हो विचार!!’ एवढंच म्हणाला.
“तुमच्या कित्येक चित्रात स्त्रिचा चेहरा हा सारखाच असतो !!! अस का ?? तेच बोलके डोळे, तीच ओढ!!”
विशाल फक्त सायलीकडे पाहत राहिला. काहीच बोलला नाही.

कित्येक वेळ कोणीच बोललं नाही. सायली कंटाळून म्हणाली.

“नुसती चित्र काढण्यात तुम्हाला कंटाळा येत नाही सर??”
“ज्या गोष्टीत आनंद मिळतो !! त्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही !!”
सायली काहीच बोलली नाही. कंटाळून अखेर ती म्हणाली.
“सर मी येते !!”

विशाल काहीच म्हणाला नाही. एकदा फक्त त्याने सायलीकडे पाहिले आणि चित्र काढू लागला, सायलीही फक्त त्याच्याकडे क्षणभर पाहत राहिली स्वतःत हरवून गेली.

“न राहवे माझ्यात मी
शोध घ्यावा कुठे तो आता !!
चित्र ते काढावे त्याचे
रंग कोणता भरावा आता !!

आज बोलते माझेच मला
तुझ्यात पहावे कसे मी आता!!
ओठांवरील प्रेमास आता
शब्द कोणते द्यावे मी आता ??

सायली खोलीतून बाहेर केव्हा निघून गेली विशालला कळलही नाही.

क्रमशः

✍️योगेश

READ MORE

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

आज शब्दांतुन तिला आठवतांना ती समोरच असते माझ्या कधी विरहात तर कधी प्रेमात रोजच सोबत असते माझ्या बरंच काही लिहिताना कधी अश्रु मध्ये असते माझ्या कधी कवितेतल्या…
पाऊस आठवांचा || POEM IN MARATHI ||

पाऊस आठवांचा || POEM IN MARATHI ||

इथे जराशी थांब सखे आठवांचा पाऊस पडूदे..!! चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी थोडी वाट ती भिजूदे ..!!
तो पाऊस  || PAUS MARATHI KAVITA ||

तो पाऊस || PAUS MARATHI KAVITA ||

"तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात कधी अगदी मनसोक्त बरसून माझ्या सवे ते गातात कधी अगदी सरी…
गीत || GEET || KAVITA || LOVE ||

गीत || GEET || KAVITA || LOVE ||

गीत ते गुणगुणावे त्यात तु मझ का दिसे शब्द हे असे तयाचे मनात माझ्या बोलते असे तु राहावी जवळ तेव्हा सुर जे छेडले असे हुरहुर ही कोणती…
असे कसे हे || Love POEM ||

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !!…

Comments are closed.

Scroll Up

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

कथा कविता आणि बरंच काही!! will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.