“खिडकी मधुन येणारा वारा आठवणीचा गंध सोबत घेऊन येत होता. ती पलंगावर हतबल होऊन झोपली होती आणि तो तिच्या जवळच बसुन होता. शेवटच्या क्षणी तिला काय म्हणायचंय हे त्याला ऐकायच होतं. पण शब्द तिच्या ओठांवर येतंच नव्हते. बहुधा तेही रुसले असावेत कारण ती त्याची साथ अर्ध्यावरच सोडुन चालली होती. त्याच्या डोळ्यात अश्रु होते आणि मनात दुखाचा आक्रोश. पण प्रयत्न करुन ती बोलली.. ‘ मी निघुन गेल्यावर तु पुन्हा नव्याने आयुष्य सुरु कर !! माझ्या आठवणी कायमच्या पुसुन टाक !! आणि मला माफ कर मी तुला दिलेल वचन पुर्ण नाही करु शकले!! ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली. तिच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. आठवणींच्या कित्येक गोष्टी ती त्याला सांगत होती . शेवटच एकदा त्याला मनभर बोलतं होती. जीवनाच शेवटचं पानं लिहित होती.
‘तु निघुन गेल्यावर मी जगायचं तरी कोणासाठी सांग ना?’ तो तिला विचारात होता. ‘ तिच्याकडे एकटक बघत होता. ‘ माझ्या मनाचा विचार न करता तु का जातेयस !! छोट्याश्या भांडणात एक क्षण जरी नाही बोललो तरी न राहावणारा मी, तु कायमची माझ्या पासुन अशी दुर गेल्यावर मी राहु तरी कसा सांग ना?’ त्याच दुख त्याला सहन होत नव्हत. मनातल्या भावनांचा गुंता त्याला सुटत नव्हता. कित्येक गोष्टी फक्त तो सांगत होता.
पण नियतीच काही वेगळंच ठरलं होतं. क्षणात सारं संपलं होतं. तो तिला खुप काही सांगत होता. पण तिच पानं लिहुन झालं होतं. तिचा हातं तसाच त्याच्या हातात होता. खिडकीतून दिसणारा सुर्य केव्हाच मावळला होता. सावल्यांनी केव्हाच मनात घर केलं होतं. आठवणींचा अंधार आता सर्वत्र दिसत होता. तो तिला पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होता पण आता ती त्याला कायमचं सोडुन गेली होती.
ते बोलनं ती अर्धवट सोडून गेली होती. तिच्या आयुष्याची संध्याकाळ झाली होती. पण तरीही तो बोलतंच होता. तिच्या शांत चेहर्याकडे फक्त बघत होता. मनात तिला साठवत होता अगदी कायमचं.. तीच ते शांत रुप त्याला खुप काही बोलत होतं. मिटलेल्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. आणि ते अश्रु त्याला जणु सांगतं होते..
श्वासांचा हिशोब करताना
शेवटचे दोन श्वास,
“मी राखुन ठेवले होते!!
एक श्वास तुला पहायला!!
एक श्वास तुला बोलायला!!
मनातल काही सांगायला!!
तुझ्या मनातल ऐकायला!!
तुझा हात हाती घ्यायला!!
माझा हात तुझ्या हाती द्यायला!!
आठवणी जाग्या करायला!!
डोळ्यातले अश्रु पुसायला!!
दोन क्षण जगायला !!
आणि प्रत्येक श्वासांवर !!
तुझच नाव लिहायला!!
मी .. शेवटचे दोन श्वास
राखुन ठेवले होते…!!”