SHARE

शेवट भाग

“क्षण न क्षण आता दृष्टीच्या विचारात जात होता. क्षितिज हताश होऊन आपल्या खोलीत बसला होता. रात्र सरून दिवस उजाडला होता पण त्याच भान त्याला राहील नव्हतं. त्याची ही अवस्था पाहून आईला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. ती त्याच्या खोलीत जाते तेव्हा तो आपल्याच विचारात गुंग होता. त्याला अश्या अवस्थेत पाहून आई म्हणते,
“क्षितिज असा हताश होऊ नकोस रे !!! ती येईल पुन्हा !! ती करेन तुला कॉन्टॅक्ट !! तिलाही आता राहवत नसेल रे तुझ्या शिवाय !!”
क्षितिज फक्त आईकडे पाहतो. तिच्या डोळ्यात त्यालाही दृष्टी बद्दलची काळजी दिसून येते.
“चल ! दुपार झाली !! जेवायला चल !!! “आई त्याला उठवत म्हणते.
“नाही नकोय मला आई !! ” क्षितिज आईकडे पाहत म्हणतो.
“का ??”
“भूक नाहीये !!”
“काल सकाळी जेवला आहेस तू !! अजुन भूक नाही !! चल बर !! अस उपाशी बसू नये !! “

आई आणि क्षितिज दोघेही जेवायला बसतात. जेवत जेवत आई क्षितिजला कित्येक मनातल्या गोष्टी बोलू लागते.
“तुला माहितेय क्षितिज !!! तुझे बाबा जेव्हा असेच मला न सांगता गेले होते तर मलाही असंच सार काही नकोस वाटायला लागलं होत!!! “
“मग !! तू काय केलंस ??” क्षितिज कुतूहलाने तिला विचारतो.
“मी काहीच केलं नाही!! शोधलं फक्त !! पण तिथे शोधायचं विसरून गेले जिथे ते होते !! “
“म्हणजे ??” क्षितिज आईकडे लक्ष देवून ऐकू लागला.
“म्हणजे या मनात !! आपली आवडती व्यक्ती कुठे जरी गेली तरी ती मनात नेहमीच आपल्या सोबत असते !! आणि मग थोडा विचार केला तेव्हा लक्षात आलं की तुझे बाबा जाऊन जाऊन जातील तरी कुठे जरी रस्ता चुकले तरी !! तिथे मला ते नक्की मिळतील !! आणि ते मला भेटले !!”
“म्हणजे तुझा विश्वास तुला त्यांना पुन्हा भेटणार हे सांगत होते तर !!”
आई काहीच बोलत नाही. ती क्षितिजकडे पाहून फक्त हसते.

क्षितिज जेवण करून आपल्या खोलीत येतो. त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं. अखेर तो थोड्या वेळाने त्याच टेकडी वर जातो. जिथे दृष्टी आणि तो निवांत कित्येक वेळ गप्पा मारत बसायचे. क्षितिजच्या नजरेतून दृष्टी संध्याकाळ अनुभवायची.तिथे शेजारी कित्येक जोडपी निवांत सूर्यास्त पाहत बसली होती. त्याच शेजारी क्षितिज बसून राहतो, एकटाच पाहत त्या सूर्याकडे.

“या संध्याकाळी सर्व काही आहे फक्त माझी दृष्टी सोडून !! आज ती सोबत नाही तर हे सगळं मला अगदी बेरंग वाटायला लागलं आहे. काय करावं ??कुठे शोधावा तो रंग !! काहीच कळत नाही !! दृष्टी माझ्या आयुष्यात अचानक यावी आणि अशी सहज निघून जावी अस मला कधी वाटलं ही नव्हतं. याच त्या बाकड्यावर ती मला कित्येक वेळ आपल्या मनातलं सारं काही सांगत बसायची !! मलाही ती सोबत असली की पूर्णत्व मिळाल्याची जाणीव व्हायची!! आज अगदी सार काही शांत झालं असच वाटायला लागलं आहे !! “

कित्येक विचार मनात येऊन गेले. संध्याकाळ आता आपल्या सावल्या पसरू लागली. जणू पुन्हा क्षणांची आठवण झाली. क्षितिज आता जायला निघाला. समोर पाहून क्षणभर थांबला. ती दृष्टी होती. काहीतरी शोधत, चाचपटत होती. आजूबाजूला मदतीचा हात मागत होती. तिला पाहताच क्षितिज भानावर आला. पळत तिच्या बाजूने जाऊ लागला. तिच्या समोर उभा राहून तिला बोलू लागला…

“दृष्टी !! दृष्टी !!!” त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
“कोण ?? कोण ???” क्षणभर दृष्टी जागेवरच थांबली.
“कुठे होतीस तू ?? कुठे निघून गेली होतीस तू ???”
आता तिने क्षितिजचा आवाज ओळखला. हातातली काठी नकळत खाली पडली. दृष्टीने क्षितिजला जोरात मिठी मारली.
“क्षितिज !!! ” दृष्टीला पुढे काय बोलावं काहीच सुधरेना. कित्येक वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत तसेच राहिले.

क्षितिज आता स्वतःला सावरत होता. दृष्टीही क्षितिजला भेटून आनंदी झाली होती. दृष्टिकडे पाहत क्षितिज विचारू लागला.
“कुठे ?? गेली होतीस ?? आणि कोण तुझे आई बाबा ?? ” कुठे आहेत ??”
“मला खरंच काही कळलं नाही रे क्षितिज हे !! हे सारं अनपेक्षित होतं मला !! कोण कुठले लोग मला माझे आई बाबा आहेत अस सांगत होते!! काही क्षण मलाही विश्वास बसला. पण रेल्वे स्टेशन वर जेव्हा मी त्याच बोलणं नकळत ऐकलं तेव्हा मला कळलं की !! ते वेश्या व्यवसाय करणारे लोग होते !! त्याचा मला बाहेर परदेशात जाऊन विकण्याचा विचार होता !! कसंबसं मी तेथून पळ काढला.!! ते माझ्या मागावरच होते !! पण नंतर कुठे गेले काहीच माहीत नाही !!!”. दृष्टी मनातल्या कित्येक गोष्टी बोलून दाखवत होती.
“मग तू इथे कशी आलीस??” क्षितिज कुतूहलाने विचारतो.
” तू संध्याकाळच केलेलं वर्णन मला आठवत होत !! ती टेकडी !! तो सूर्यास्त!! सार काही आठवत होत !! लोकांना विचारतं होते !! अशी टेकडी कुठे आहे म्हणून !! मग कोणी एका मुलीने मला इथे सोडलं !! “
क्षितिज क्षणभर शांत बसतो आणि पुढच्या क्षणी दृष्टीला जोरात मिठी मारतो.

कित्येक वेळ क्षितिज आणि दृष्टी एकमेकांना बोलत बसतात. अचानक तेव्हा क्षितिजचा फोन वाजतो. क्षितिज पाहतो तर आश्रमातून फोन होता.
“हॅलो!!!”
“क्षितिज!! मालती ताई बोलते !!”
“बोलाना मालती ताई!!” क्षितिज स्वतःला सावरत म्हणतो.
“अरे !! दृष्टीला घेऊन जाणारे तिचे आई बाबा हे खोटे निघाले!! ते तिचे आई बाबा नाहीयेत !! त्यांना आत्ताच पोलिसांनी ताब्यात घेतलंय !!”मालती ताई झाली हकीकत सांगू लागल्या.
“कधी ??” क्षितिज अचानक म्हणाला.
“आत्ताच!! अरे तू गेल्यावर मला राहवलंच नाही !! मी तडक पोलिसांकडे आले !!! पोलिसांच्या मदतीने त्या चोरांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केली!! तेव्हा ते खोटे निघाले !!”
“तरी मला शंका होतीच !! असे कसे आई बाबा मध्येच आले !!!”क्षितिज.
“होणं !! पण यात काही आश्रमातल्या मुलींचाही सहभाग होता!! हेही कळलं!! ” मालती ताई अगदी कष्टी आवाजात बोलल्या.
“काय ?? खरंच !!! “
“हो !! पण एक आहे रे !! या सगळ्यात अजुन दृष्टी कुठे आहे तेच कळल नाही !! हे चोर म्हणतायत की ती त्यांना चुकवून पळून गेली !!!”
“मालती. ताई!! दृष्टी माझ्या सोबत आहे !!!” क्षितिज दृष्टीला पाहत म्हणतो.
“काय !! दृष्टी सापडली !!” मालती ताई आनंदाने बोलू लागल्या. त्यांच्या शेजारी उभी भावना ही आनंदाने नाचू लागली.
“हो !! आम्ही येतोय थोड्या वेळात !!”
“ठीक आहे !!” मालती ताई फोन ठेवतात. शेजारी उभ्या भावनाकडे पहात तिला मिठी मारतात. त्याच्या डोळ्यातून आनंदाने कित्येक अश्रू वाहू लागतात.

दृष्टी आणि क्षितिज काहीच बोलत नाहीत. ती शांतता त्यांना आपल्या मनातलं बोलत होती. अखेर क्षितिज दृष्टीला बोलतो.
“दृष्टी !!”
“बोल ना !! ” दृष्टी क्षितिजच्या जवळ येत म्हणते.
“मला यापुढे कधीच सोडून जाणार नाहीस ना तू ??”
“कधीच नाही !!!” दृष्टीला गहिवरून येतं.
“लग्न करशील माझ्याशी ???” क्षितिज तिचा हात हाती घेत म्हणतो.
“आयुष्यभर अशीच माझी दृष्टी बनून राहशील ??”
“हो !! अगदी कायमच !!!”
एवढं बोलतच दृष्टी क्षितिजला मिठी मारते.
“हो !! करेन मी लग्न तुझ्याशी !!!”

दोघे कित्येक वेळ बसून राहतात. थोड्या वेळाने ते आश्रमात जातात. तिथे सगळे दृष्टीची वाटच पाहत बसलेले असतात. अखेर क्षितिज मालती ताईंना विचारतो.
“मालती ताई !! आज मी दृष्टीला घरी घेऊन जाऊ ??”
मालती ताई फक्त होकारार्थी मान हलवतात आणि क्षितिजकडे कौतुकाने पाहतात.

अखेर क्षितिज आणि दृष्टी घरी येतात. दरवाजा समोर येतात. क्षितिज बेल वाजवतो. थोड्या वेळात समोर आई दार उघडते.क्षितिज आणि दृष्टीला पाहून क्षणभर गोंधळून जाते आणि बोलते ..
“क्षितिज !! बाळा कुठे होतास !!! आणि !!!”
“आई ही दृष्टी !!” क्षितिज आईला मध्येच थांबवत बोलतो.
“मी आल्या आल्या ओळखलं होत!! ” आई दृष्टीकडे पाहत म्हणते.
“बाळ दृष्टी !!!”
“हा आई !!! “दृष्टी गोंधळून जाते आणि लगेच बोलते.
“सॉरी काकू!!”
“नाही आईच म्हण मला !! ये ना बस !!”. आई दृष्टीला घरात घेत बोलते.
“क्षितिजने वर्णन केलं त्याहीपेक्षा खूप सुंदर आहेस तू !!” आई दृष्टीला मनातलं बोलत होती.
दृष्टी फक्त गालातल्या गालात हसते. आई पुढे क्षितिजला विचारते.
“कुठे भेट झाली तुमची ???”
क्षितिज झाली हकीकत सांगतो. आईला सगळं ऐकून नवलच वाटले. अशीही माणसं या जगात आहेत याचा तिला विश्वासचं बसत नव्हता.

अखेर आई आणि दृष्टी कित्येक वेळ बोलत बसतात. क्षितिज फक्त दोघींकडे पाहत राहतो. आईच्या हातात दृष्टीचा हात त्याला खूप काही सांगून जातो, तो फक्त पाहत राहतो .. ..!!

“विखुरल्या क्षणात, मी तुला शोधणे
अश्रुसवे तेव्हा, नकळत तू भेटणे !!
हात तुझा हाती, सारेच ते सांगणे
तू आणि मी, बाकी एवढेच उरणे!!

हळूवार ती लाट, मनास स्पर्श करणे !!
भावण्या त्या मनातल्या, उगाच बोलणे!!
न राहवून तुला , पाहत राहणे !!
सांग कसे मी आता , स्वतःस सावरणे!!

तू इथे मी तिथे , नकोच हे बहाणे !!
मिठीत यावे जेव्हा , हरवून ते जाणे !!
सांग देशील का साथ ,एवढेच विचारणे !!
नकोच तो दुरावा , एवढेच मागणे !!”

क्षितिज समोर पाहून अगदी मनातून खूप आनंदी झाला. आयुष्याच्या नव्या वाटेवरती उभा राहिला.

  • समाप्त *

✍️©योगेश खजानदार

READ MORE

अखेर || AKHER LOVE POEM MARATHI ||

अखेर || AKHER LOVE POEM MARATHI ||

एकांतात राहशील ही तु बुडत्या सुर्याकडे पहाणार तो मी नसेल मोकळेपणाने कधी हशील ही तु पण हसवणारा मी नसेल
अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही
अनोळखी नाते..|| NATE PREMACHE || KAVITA ||

अनोळखी नाते..|| NATE PREMACHE || KAVITA ||

नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती…
अबोल नाते… || ABOL NATE POEM ||

अबोल नाते… || ABOL NATE POEM ||

नको अबोला नात्यात आता की त्यास त्याची सवय व्हावी अबोल भाषेतूनी एक आता गोड शब्दाची माळं व्हावी
अबोल प्रेम || ABOL PREM MARATHI POEM ||

अबोल प्रेम || ABOL PREM MARATHI POEM ||

न कळावे तुला कधी शब्दांन मधील भाव सखे मन ओतले त्यातुन तरी अबोल तुझ न प्रेम दिसे मी लिहावे किती सांग तरी प्रेम हे का शुन्य असे एक ओढ मझ…
अबोल राहून…!! || ABOL RAHUN KAVITA ||

अबोल राहून…!! || ABOL RAHUN KAVITA ||

अबोल राहून खूप काही बोलताना तिच्याकडे फक्त बघतच रहावं तिच्या प्रत्येक नखऱ्याला डोळ्यात फक्त साठवून घ्यावं नसावी कसली भीती तिला तिच्यासारखं आपणही बिंधास्त रहावं
अल्लड ते हसू …!! SMILE MARATHI KAVITA ||

अल्लड ते हसू …!! SMILE MARATHI KAVITA ||

अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात…
अस्तित्व || ASTITV EK KAVITA ||

अस्तित्व || ASTITV EK KAVITA ||

स्वतःच अस्तित्व शोधताना मी कुठेतरी हरवुन जाते समाज, रुढी, परंपरा यात आता पुरती मी बुडून जाते कोणाला मी हवीये तर कोणासाठी बोज होऊन जाते एक स्त्री म्हणून जगताना आज खरंच…
अहंकार || AHANKAR || POEM ||

अहंकार || AHANKAR || POEM ||

मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती
आजही तु तशीच आहेस. . || LOVE POEM ||

आजही तु तशीच आहेस. . || LOVE POEM ||

काळाने खुप पानं बदलली पण आजही तु तशीच आहेस खरंच सांगु तुला एक तु आजही आठवणीत आहेस एकांतात चहा पिताना तु माझ्या ओठांवर आहेस कधी ह्दयात कधी मनात माझ्या क्षणात…

Leave a Comment

Your email address will not be published.