दृष्टी || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORIES ||

भाग ३

क्षितिज खोलीतून लगबगीने बाहेर येतो. कारची चावी शोधू लागतो. त्याची ही लगबग आईच्या लक्षात येते. आई विचारते.
“काय झालं क्षितिज ??”
क्षितिज गडबडीत बोलतो.
“आई दृष्टी खोलीत पडली !!”
“काय ? कसं काय ?? लागलंय का तिला खूप ??” आई विचारते.
“माहित नाही !! पण भावनाचा फोन आला होता!! आई कारची चावी कुठे दिसतेय का बघ ना !!”
“अरे ही काय समोरच तर आहे !!” टेबलावरची चावी क्षितिजला देत आई म्हणते.
“येतो मी !!” लगबगीने क्षितिज घरातून बाहेर पडतो.
” सांभाळून जा !!” आई पाठमोऱ्या क्षितिजकडे पाहत म्हणते.
आश्रमात जाई पर्यंत क्षितिजचा जीव अगदी कासावीस झाला होता. तिला लागलं तर नसेल ना जास्त. तिला नेमक झालं तरी काय असेल. कशी अशी पडली ती.कोणी सोबत नव्हतं वाटत तिच्या. क्षणही जरा सावकाश जात आहेत असंच त्याला वाटत होत. क्षण न क्षण त्याला दृष्टीच्या चिंतेन व्याकुळ केलं होतं. लगबगीने तो आश्रमात आला. समोर मालती ताई होत्या त्यांना पाहून क्षितिज क्षणभर जागीच थांबला. मालती ताईंनी त्याला आत येण्यासाठी खुनावल. तेव्हा क्षितिज आत आला. त्यांच्या जवळ जात विचारू लागला.
“काय झालं दृष्टीला ??”
“खोलीत अडखळून पडली ती!!”
“खूप लागलंय का ??”
“डावा हात जरा दुखतोय तिचा !! डॉक्टरांनी दोन तीन दिवस रेस्ट घ्यायला सांगितलं आहे !!!”
“मी पाहू शकतो तिला !!”
मालती ताई फक्त होकारार्थी मान हलवतात.
क्षितिज आणि मालती ताई दृष्टीच्या खोलीकडे येतात. दृष्टी आपल्या पलंगावर शांत झोपली होती. तिला नुकतंच डॉक्टरांनी औषध दिलं होत.
“डॉक्टरांनी आत्ताच औषध दिलं तेव्हा तिला बरं वाटायला लागलं!! इतका वेळ डावा हात खूप दुखतोय म्हणून खूप रडत होती!!” मालती ताई क्षितिजला सांगत होत्या.
क्षितिज काहीच बोलत नाही. फक्त ऐकत राहतो. मालती ताई आणि तो दृष्टीच्या समोरच थोड लांब बाकावर बसतात. क्षितिज ऐकटक दृष्टीकडे पाहत राहतो. नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यांना लपवण्याचा व्यर्थ प्रयत्न तो करतो. मालती ताई त्याच्याकडे पाहून बोलतात.
“प्रेमात लोक रूप बघतात, पैसा बघतात, स्टेटस बघतात तू काय पाहिलंस दृष्टी मध्ये क्षितिज ??”
क्षणभर क्षितिज मालती ताईंकडे बघतो आणि म्हणतो.
“नितांत प्रेम !! फक्त प्रेम !! तिच्या ओठातून येणाऱ्या प्रत्येक शब्दावर प्रेम !! माझ्या आठवणीत स्वतःच झुरणाऱ्या त्या क्षणांच प्रेम !! माझ्यासाठी ,मला आनंदी राहता यावं म्हणून माझ्या नजरेतून हे जग पाहण्यावर प्रेम !! “
“इतकं कोणी कोणावर प्रेम करू शकत ???”
क्षितिज काहीच बोलत नाही ओठांवरती एक स्मित फक्त येत.
“दृष्टी खरंच बोलली होती!! रक्ताच्या नात्यां पलिकडे जाऊन नाती कशी असतात ते नक्की इथेच आल्यावर कळत !!!”
मालती ताई आणि क्षितिज एकमेकांकडे पाहत हसतात.
दृष्टी आता हळूहळू झोपेतून जागी होऊ लागली होती. ती जागी झालेली पाहून मालती ताई आणि क्षितिज दोघेही तिच्या जवळ जातात.
“आता कस वाटतंय दृष्टी??” मालती ताई विचारतात.
“बर वाटतयं!!” दृष्टी थोड्या बसल्या स्वरात बोलते.
“तुला भेटायला कोण आलंय माहिती का ??”
“कोण ??” दृष्टी उत्सुकतेने विचारते.
“आता कस वाटतंय दृष्टी ?? बरी आहेस ना ??”
“कोण ?? क्षितिज ?? ” दृष्टी जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत बोलते.
“हो मीच आहे !!! “
दृष्टीला काय बोलावं काहीच कळत नाही. “मालती ताई ??” एवढंच ती बोलते.
“हो मीच सांगितलं होत भावनाला !! क्षितिजाला फोन करून कळवायला !!!”
दृष्टीला क्षणात दुखणे विसरल्या सारखे झाले. क्षितिज जवळ आहे या विचारांनी तिला मनातून खूप आनंद झाला.
“तुम्ही दोघे बसा बोलत !! मी येते जरा जाऊन !!” मालती ताई खोलीच्या बाहेर जात म्हणाल्या.
दृष्टी क्षणभर शांत बसली आणि जवळच बसलेल्या क्षितिजाला म्हणाली.
“क्षितिज !! जरा जवळ ये ना !!”
“काय !! जवळ येऊ !! कशाला ???”
” ये ना !! सांगते !! “
क्षितिज तिच्या जवळ येत.
“हा आलो !!!बोल !!”
क्षितिज जवळ येताच त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या हाताला झाला.एका हाताने घट्ट तिने क्षितिजाला मिठी मारली. क्षितिजं ने ही तिला घट्ट मिठी मारली.ओठांच्या स्पर्शात ओठ हरवून गेले. त्या क्षणात दृष्टीच्या आयुष्याच्या क्षितिजा मध्ये कित्येक तारे बहरून गेले. एकमेकांस सावरत क्षितिज पुन्हा शेजारच्या खुर्चीवर बसला.
“आता किती दिवस अस पडून राहायचं ??”
“आता अशी बरी होईल मी !!”
“हो पण !! डॉक्टरांनी दोन तीन दिवस आराम करायला सांगितला आहे हे विसरू नकोस !!”
“तू आहेस ना आता सोबत !! क्षणात नीट होईल मी !!”
“हो का ?? छान !! पण जरा दुसऱ्याच ऐकावं माणसानं!!”
“हो म्हणजे मी तुज ऐकत नाही अस म्हणत आहेस ना ??”
“तस नाही !!! “
“मग कस ??”
“मी सांगू ???” मागून येणारी भावना दोघांच्या मध्येच बोलते.
“कोण भावना ? तू आता इथे कशी काय ?? “
“आले होते !! ताईसाहेब बऱ्या आहेत का त्या पाहाल्या!!”
“पण आता क्षितिज दादा आला म्हटल्यावर काय ठीकच असणार !!”
“ये!! भावना आगाऊ पणा करू नकोस हा !! “
“राहील तर मग !!!” एवढं बोलून भावना बाहेर पळतच जाते.
क्षितिज कित्येक वेळ दृष्टी जवळ बसून राहतो. दिवसाची रात्र होत आलेली असते. घड्याळात सहा वाजल्याचे ठोके पडतात.
“क्षितिज तू जा घरी !! संध्याकाळ झाली!! घड्याळात बघ किती वाजले ते !!”
“नाही मी कुठेही जाणार नाहीये !! तुला पूर्ण बर वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही!!”
“खरंच मला बर वाटतंय आता !उगाच तू तुझ्या तब्येतीची हेळसांड करू नकोस !! “
“मला काही होत नाही !!”
तेवढ्यात आतमध्ये कोणी एक मुलगी जेवणाचे ताट घेऊन येते. शेजारी ताट ठेवून ती म्हणते.
“ताई जेवायचं ताट आणलय!! उठ बरं!! ” तिला अलगद उठवून बसत ती म्हणते. क्षितिज ही तिला उठून बसायला मदत करतो.
“मालती ताईंनी तुम्हाला ही जेवून जायला सांगितलय !! हे दुसरं ताट तुमच्यासाठी !!” क्षितिज फक्त तिच्याकडे हसून पाहतो.
ती मुलगी बाहेर निघून जाते. आणि तेवढ्यात दृष्टी बोलते.
“वाह !! आज चक्क जेवण !! तेही क्षितिजला !!”
“मनाने खूप चांगल्या आहेत मालती ताई !! ” क्षितिज नकळत बोलतो.
“तुला म्हटलं होत ना मी !!”
“हो !!”
क्षितिज आणि दृष्टी दोघेही एकत्र जेवण करतात.थोडा वेळ गप्पाही मारतात. नंतर औषध घेतल्या नंतर दृष्टीला नकळत झोप लागते. तिला व्यवस्थित झोप लागली हे पाहताच क्षितिज आता जायला निघतो, पण क्षणभर तिच्या त्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहतो..त्यात हरवून जातो,
“नको दुरावा आज हा
सोबतीस राहावे मी सदा !!
भाव या मनीचे ओळखून
मिठीत घ्यावे मी तुला !!
रेंगाळला का क्षण असा
आठवांचा नकोसा जाच हा!!
ओठांवरचा गोडवा तो
टिपून घ्यावा मी सदा !!
सांग सखे !! तू मला !!
भेटणे ते, कधी पुन्हा ??
हरवून जावे मी तुझ्यात
नी हरवून जावे या क्षणा!!
वाटते मज का उगा !!
सोबतीस रहावे मी सदा !! “
क्षितिज आता आश्रमातून बाहेर येऊ लागला होता. समोर मालती ताईंना पाहून क्षणभर थांबला. उद्या पुन्हा तिची भेट घ्यायला येईन हे सांगून तो घरी निघाला.घरी आई त्याची वाटच पाहत बसली होती. दरवाजा उघडून क्षितिज घरात येताना पाहून आई बोलू लागली.
“कशी आहे दृष्टी ??”
“बरी आहे आता !! हाताला थोड लागलंय तिच्या !! पण बरी होईल दोन तीन दिवसात !!”
“बर !! मी काय म्हणत होते क्षितिज !! तिला दोन तीन दिवस इकडेच आणले तर??”
“खरंच ??” क्षितिज चेहऱ्यावर हसू येत म्हणाला.
“अरे हो खरंच !! इथे तिची चांगली काळजी पण घेतली जाईल !!”
“मालती ताई नाहीत परवानगी देणार !!”
“एकदा विचारून तर बघ !!” आई क्षितिजकडे पाहत म्हणते .
“ठीक आहे !! विचारतो !!तू जेवलीस ??” क्षितिज आई जवळ बसत म्हणाला.
“नाही रे !! तुझी वाट पाहत बसले !! तू जेवून आलास का ??”
“हो !! म्हणजे आश्रमातच झालं !! पण चल ना !! तुझ्यासोबत बसेन मी !! चल !!”
क्षितिज आणि आई दोघेही एकत्र बसले. आई सोबत क्षितिज तिचे जेवण होईपर्यंत बसून राहिला.
उद्या दृष्टीला घरी घेऊन यायचं या विचाराने त्याच मन सुखावून गेलं होतं.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *