भाग २
कामावर जाताना बाबांच्या डोक्यात सदाला दुर्बीण कशी घेऊन द्यावी हाच विचार होता. आपली परिस्थिती जेमतेमच पण मुलाची स्वप्न मात्र खूप श्रीमंत असे त्यांना वाटत होते.
दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात.
“काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?” बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे.
“नाही शेठ विशेष काही नाही!!”
“आल्यापासून पाहतोय कुठेतरी गुंग आहेस?”
“सदाशिवने काल दुर्बीण हवी आहे अशी मागणी केली, पण शेठ दुर्बीण घ्यायची म्हणजे ती महाग असणारच , त्याला त्यातून आकाशातले तारे पहायचे जवळून!!”
“पोराचं बोलणं एवढं काय मनावर घ्यायचं, आज दुर्बीण म्हणेन उद्या अजुन काही ,सगळेच असे पुरे करणार आहेस का लाड ?”
” नाही शेठ त्याला मला दुर्बीण घेऊन द्यायचीये!! हे एवढस स्वप्न मला पुर करायचं आहे!!”
“नक्की करशील रे विनायका !! पण कामाचा तान नको जास्त घेऊस !! “
“नाही !!”
बाबा संध्याकाळी घरी आले दिवसभर विचार करून त्यांना काय करावे तेच कळेना.
“आई , बाबा आले आहेत !!” सदा घरात येणाऱ्या बाबांकडे बघत म्हणाला.
“काय रे सदा , आज अभ्यास नाही वाटत?”
” अंगणात बसतोय आता अभ्यासाला बाबा!!” सदा बाबांकडे पाहत म्हणाला आणि अंगणात निघून गेला.
“आज त्या कुळकर्ण्या सावकाराला ५००₹ मागून बघितले! तर म्हणे आदीचेच दिले नाहीत अजुन आणि आजून कर्ज कस देणार !!” बाबा आईकडे पाहत म्हणाले.
” आता पुन्हा कर्ज कशाला काढायचं?”
“लता सगळी चौकशी केली, त्या दुर्बिणीच्या बद्दल सगळी माहिती काढली मी म्हणून त्याला पैसे मागितले!!” बाबा उत्साहात बोलत होते.
” त्या दुर्बिणीच खुळ तुमच्या डोक्यातून गेलच नाही का आजुन?” आई एकदम रागात म्हणाली.
“खुळ काय म्हणतेयस लता , आपल्या मुलाचं स्वप्न म्हण हवं तर!”
“आहो पण आपल्याला जमणार का ते ??”
“प्रयत्न तर करूयात!!” बाबा अंगणातल्या सदा कडे पाहत म्हणाले.
बाहेर सदा आकाशातील चांदण्या मोजण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एखादा निखळणारा तर पाहून त्याकडे कुतूहलाने पाहत होता. बहुदा आपल्या स्वप्नांना जवळ करण्याचा प्रयत्न करत होता.
बाबांना काही केल्या दुर्बिणी शिवाय काही दिसत नव्हत. सावकार कर्जही देत नाही म्हटल्यावर बाबांना दुसरा मार्गही सुचत नव्हता. खूप विचार झाल्यावर शेठना पैसे मागून पहायचं अस त्यानं ठरवल. अशाच विचारत आकाशात सूर्यकिरणांचा प्रकाश पडू लागला. रोजच्या प्रमाणे सगळ आवरून बाबा कामावर गेले.
शेठला पैश्याची मागणी कशी करावी हेच त्यांना कळेना. शेवटी त्यांनी विचारलेच.
“शेठजी , थोड विचारायचं होत तुम्हाला!!”
“अरे विनायका , बोल काय काम आहे ??” शेठजी कुतूहलाने विचारू लागले.
“शेठ मला ५००₹ मिळतील का ?” बाबा शेजारी ठेवलेल पुस्तकं पाहत म्हणाले.
“विनायका, कशाला रे हवे एवढे पैसे ??”
“सदाला दुर्बीण घ्यायची आहे!!”
“विनायका, असते तर नक्की दिले असते रे पैसे , पण सध्या तुझा शेठ थोडा अडचणीत आहे !!”
“ठीक आहे शेठ!!” बाबा बोलत बोलत सर्व काम करत होते. शेठ कढून ही पैसे नाहीत म्हटल्यावर त्यांना आता पैसे मागावें तेच कळेना.
स्वप्न पाहताना कदाचित मी कमी पडलो असेन पण माझ्या मुलाला प्रत्येक स्वप्न मिळावं असं बाबांना वाटत . दिवस सरला आणि बाबा आणीं सदा जेवण आटोपून निवांत आंगणात पडून चांदण्या पाहत होते .
“बाबा , ते पहा त्या चांदण्या एकत्र केल्या की एक चित्र तयार होते !!”सदा उत्साहाने म्हणत होता.
“कोणत रे सदा ??”
” आपल्या सायकलच!!”