"दिवस माझे नी तुझे
 गोड त्या स्वप्नातले!!
 चांदण्या रात्रीचे क्षण
 परतुन आज यावे!!

 सखे सोबत तुझी
 अंधारल्या त्या रात्री!!
 लागी मनाला ओढ
 आज मिठीत यावे!!

 हे प्रेम की वेदना
 मना काही समजेना!!
 तुझ्या त्या ओढीने
 वाट कीती पहावे!!

 लगबग ही मनाची
 वाट त्या येण्याची!!
 दुरून हा इशारा
 प्रेम करूनी पहावे. ..!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

बलात्कार || BALATKAR MARATHI POEM

सुरुवात होती या जगात माझी चूक नी बरोबर काही माहीत नव्हते माणुसकीच्या बुरख्यात येऊन राक्षस मला दिस…
Read More

पांथस्थ || Panthast EK Kavita ||

वाऱ्यास पुसूनी ती वाट पुढची त्या सावलीतला मी एक पांथस्थ हवी थोडी विश्रांती नी घोटभर पाणी पुढच्या …
Read More
Scroll Up