जन्म
१. लालकृष्ण आडवाणी, भारताचे ७वे उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे सहसंस्थापक (१९२७)
२. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, सुप्रसिद्ध मराठी लेखक, संगीतकार, दिग्दर्शक , पटकथा लेखक (१९१९)
३. उषा उत्थाप, भारतीय गायिका (१९४७)
४. एडमंड हॉले, इंग्लिश गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ (१६५६)
५. जिन कॅसिमिर – पेरियर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (१८४७)
६. ब्रेट ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू (१९७६)
७. हर्बर्ट ऑस्टिन, ऑस्टिन मोटर कंपनीचे संस्थापक (१८६६)
८. अरविंद त्रिवेदी, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते ,राजकीय नेते (१९३८)
९. मार्गारेट मिचेल, अमेरिकन लेखिका (१९००)
१०. जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेते इलेक्ट्रिक इंजिनियर (१९२३)
११. सितारादेवी, भारतीय चित्रपट अभिनेत्री, नृत्यांगना (१९२०)
१२. डॉ. कमल रणदिवे, कर्करोग संशोधन क्षेत्रातील शास्त्रज्ञ (१९१७)
मृत्यू
१. मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचे महाराजा (१९३३)
२. जॉन मिल्टन, इंग्लिश कवी ,लेखक (१६७४)
३. विल्यम आयर्टन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
४. सुब्रतो मूकर्जी, भारतीय वायुसेना अधिकारी (१९६०)
५. ओमप्रकाश मेहरा, भारतीय एअर मार्शल (२०१५)
६. अब्राहम कुयपर, नेदरलँडचे पंतप्रधान (१९२०)
७. ऑटो फ्रेडरिक राउवेर्डर,अमेरिकन अभियंता , संशोधक (१९६०)
८. अमांची सुब्रह्मण्यम, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१३)
९. विटल्यी गिंसबर्ग, रशियन भौतिकशास्त्रज्ञ (२००९)
१०. पीटर फाऊलर, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९९६)
घटना
१. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
२. जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००२)
३. मोंटाना हे अमेरिकेचे ४१वे राज्य बनले. (१८८९)
४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याची घोषणा केली. (२०१६)
५. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. (१८६४)
६. चीनमध्ये आलेल्या तीव्र भूकंपात ९००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९८८)
७. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. (२०२०)
८. अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघाच्या महाराष्ट्र शाखेची स्थापना करण्यात आली. (१९३२)
महत्व
१. World Town Planning Day
२. Intersex Day Of Remembrance
३. X-ray Day