जन्म
१. कमल हसन, भारतीय चित्रपट अभिनेते , राजकीय नेते (१९५४)
२. बिपिन चंद्र पाल, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८५८)
३. मेरी क्युरी, नोबेल पारितोषिक विजेत्या रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ (१८६७)
४. भास्कर धोंडो कर्वे, भारतीय लेखक (१९०३)
५. सर चंद्रशेखर वेंकट रमण, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८८)
६. कोन्राड लॉरेन्ज, नोबेल पारितोषिक विजेते प्राणीशास्त्रज्ञ (१९०३)
७. अनुष्का शेट्टी, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री (१९८१)
८. एन. जी. रंगा, भारतीय राजकीय नेते , स्वतंत्र पार्टीचे अध्यक्ष (१९००)
९. डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, भारतीय क्रांतिकारक, इतिहासकार (१८८४)
१०. मोरो केशव दामले, भारतीय निबंधकार, व्याकरणकार (१८६८)
११. गोवर्धन धनराज पारिख, भारतीय विचारवंत, शिक्षणतज्ञ (१९१५)
१२. अल्बर्ट कॅमस, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९१३)
१३. मायकेल स्पेन्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९४३)
१४. किरण राव , भारतीय चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या (१९७३)
१५. लाला कमलापत सिंघानिया, भारतीय उद्योगपती (१८८४)
१६. त्रिविक्रम श्रीनिवास, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)
१७. विद्याबेन शाह, भारतीय ज्येष्ठ कार्यकर्त्या (१९२२)
मृत्यू
१. कृष्णाजी केशव दामले, भारतीय मराठी कवी ,लेखक (१९०५)
२. आल्फ्रेड रसेल वॉलांस, ब्रिटिश प्रकृतीवैज्ञानिक (१९१३)
३. व्हिक्टर मॅकलग्लेन, ब्रिटिश बॉक्सर, अभिनेते (१९५९)
४. अश्विनीकुमार दत्ता, भारतीय प्राध्यापक (१९२३)
५. सुनिता देशपांडे , भारतीय लेखिका , स्वातंत्र्य सेनानी (२००९)
६. सी. सुब्रह्मणम, भारतीय राजकीय नेते , महाराष्ट्राचे राज्यपाल (२०००)
७. मालदेव राठोड, मारावाडचे राव (१५६२)
८. बाप्पदित्य बंदोपाध्याय, भारतीय कवी ,दिग्दर्शक (२०१५)
९. पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार (१९९८)
१०. यशवंत गोपाळ जोशी, भारतीय मराठी लेखक ,संपादक (१९६३)
११. बहादुरशहा जफर, दिल्लीचा शेवटचा बादशहा (१८६२)
१२. विल डुरांट, अमेरिकन लेखक ,इतिहासकार (१९८१)
१३. जिवराज नारायण मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१९७८)
घटना
१. वासुदेव बळवंत फडके यांना ब्रिटिशांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. (१८७९)
२. फ्रँकलिन डी रूजवेल्ट हे अमेरिकेचे चौथ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९४४)
३. मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या. (१९९०)
४. जेम्स मोनरो हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८२०)
५. अलेक्झांडर मॅकेन्झी हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१८७३)
६. स्पेन मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात ५००हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले. (१९४४)
७. तुर्कीने संविधान स्वीकारले. (१९८२)
८. वंदे मातरम् !! हे भारतमातेचे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले. (१८७५)
९. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्याने गाझा ताब्यात घेतले. (१९१७)
महत्व
१. International Merlot Day