जन्म
१. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे २रे राष्ट्रपती, प्राध्यापक, तत्ववेत्ते (१८८८)
२. पंकज त्रिपाठी, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७६)
३. मएनयूल् मोंट्ट टोर्रेस, चीलीचे राष्ट्राध्यक्ष (१८०९)
४. भालचंद्र पंढरीनाथ बहिरट, भारतीय मराठी लेखक साहित्यिक, तत्ववेत्ते , शिक्षणतज्ञ (१९०४)
५. जस्टिनिओ बोर्गोनो, पेरुचे राष्ट्राध्यक्ष (१८३६)
६. इर्शाद कामिल, भारतीय लेखक ,कवी (१९७१)
७. प्रज्ञान ओझा, भारतीय क्रिकेटपटू (१९८६)
८. व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई, भारतीय राजकीय नेते , वकील (१८७२)
९. लीलावती भागवत, भारतीय बालसाहित्यिका (१९२०)
१०. जयंत पांडुरंग नाईक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक (१९०७)
११. विधू विनोद चोप्रा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५२)
१२. स्मिता तळवलकर, भारतीय मराठी चित्रपट अभिनेत्री (१९५४)
१३. दमयंती जोशी, भारतीय कथ्थक नृत्यांगना (१९२८)
१४. प्रफुल रावल, भारतीय गुजराती लेखक कवी (१९४८)
मृत्यू
१. सर रतनजी टाटा, भारतीय उद्योगपती (१९१८)
२. लुडविग बोल्टझमन, ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (१९०६)
३. रॉय किणीकर, भारतीय कवी ,लेखक ,संवाद लेखक (१९७८)
४. फ्रान्सिस फोर्ड, अमेरिकन अभिनेते (१९५३)
५. मदर तेरेसा, नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका (१९९७)
६. नीरजा भानोत, अशोक चक्र सम्मानित भारतीय हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट (१९८६)
७. शरद जोशी, भारतीय कवी , लेखक, साहित्यिक (१९९१)
८. निरालंबा स्वामी, भारतीय धर्मगुरू (१९३०)
९. आदेश श्रीवास्तव, भारतीय गायक, गीतकार (२०१५)
१०. सलील चौधरी, भारतीय संगीतकार, गीतकार (१९९५)
घटना
१. ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. (२०००)
२. ह. वि. पाटसकर हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू बनले. (१९६७)
३. ख्रिस्ट्रीन हर्डत यांनी पहिल्यांदाच आधुनिक ब्रेसीयरचे पेटंट केले. (१८८९)
४. अलिप्त राष्ट्रांनी पहिली परिषद बेलग्रेड येथे घेतली. (१९६१)
५. कार्लोस इबानेझ हे चीलीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५२)
६. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेरोल्ड फॉर्डवर खुनी हल्ला झाला. (१९७५)
७. PAN AM 73 हे अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे, मुंबईहून निघालेल्या विमानाचे, कराची पाकिस्तानमध्ये चार पॅलेस्टिनियन आतंकवाद्यांनी अपहरण केले. यामध्ये ४०हून अधिक प्रवाशी तसेच विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. विमानाच्या फ्लाईट अटेंनडंट नीरजा भानोत यांनी यावेळी दाखवलेल्या धाडसामुळे कित्येक प्रवाशांचे प्राण वाचले. पण नीरजा भानोत यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना भारताने मरणोत्तर अशोकचक्र पुरस्काराने गौरविले. तसेच पाकिस्तानने त्यांना निशाण- ए- पाकिस्तान या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले. (१९८६)
महत्व
१. National Teachers Day
२. World Samosa Day
३. International Day Of Charity