जन्म
१. जमनालाल बजाज, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, उद्योगपती, बजाज उद्योग समूहाचे संस्थापक (१८८४)
२. मिलिंद सोमण, भारतीय चित्रपट अभिनेते (१९६५)
३. शरदचंद्र रॉय, भारतीय मानववंशशास्त्रज्ञ (१८७१)
४. तबस्सुम फातिमा हाश्मी तथा तब्बू, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७०)
५. वासुदेव बळवंत फडके, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशत्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक (१८४५)
६. टोमास अर्सिझेसकी, पोलंडचे पंतप्रधान (१८६७)
७. भाई परमानंद, हिंदू महासभेचे नेते (१८७६)
८. कार्लोस गार्सिया, फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष (१८९६)
९. जोसेफ रोटब्लाट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०८)
१०. छबिलदास मेहता, गुजरातचे मुख्यमंत्री (१९२५)
११. शकुंतला देवी, भारतीय गणितज्ञ, लेखिका (१९२९)
१२. थॉमस कलेस्टील, ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष (१९३२)
१३. मॅट्टी वन्हेन, फिनलंडचे पंतप्रधान (१९५५)
१४. इ. एस. एल. नरसिंहमन, तेलंगणाचे राज्यपाल (१९४५)
१५. डेव्हीड ज्युलियस, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रियाशास्त्रज्ञ (१९५५)
१६. टोनी अबुट्ट, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९५७)
मृत्यू
१. नागार्जुन, भारतीय हिंदी कवी (१९९८)
२. दिलीप परदेशी, भारतीय नाटककार, साहित्यिक (२०११)
३. गुस्टव सच्वाब, जर्मन लेखक (१८५०)
४. टकाशी हारा, जपानचे पंतप्रधान (१९२१)
५. स. मा. गर्गे, भारतीय इतिहासकार (२००५)
६. पंडित शंभू महाराज, लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक (१९७०)
७. मनुएल अझाना, स्पेनचे पंतप्रधान (१९४०)
८. यित्झॅक राबिन, नोबेल शांतता पुरस्कार विजेते इस्राएलचे पंतप्रधान (१९९५)
९. जॉर्ज चांबर्स, त्रिनिनाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान (१९९७)
१०. इकबाल अली शाह, भारतीय लेखक (१९६९)
११. जॉर्ज क्लाईन, मोटर व्हीलचेअरचे निर्माते (१९९२)
घटना
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला. (१९४८)
२. जेम्स बुकानन हे अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८५६)
३. पुण्यात डेक्कन सभेची स्थापना झाली. (१८९६)
४. जपानचे पंतप्रधान हारा तकाशी यांची टोकियो येथे हत्या करण्यात आली. (१९२१)
५. बांगलादेशने संविधान स्वीकारले. (१९७२)
६. बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२००८)
७. रेने मुआवद हे लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९८९)
८. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया आणि हंगेरी या देशांनी इटली समोर शरणागती पत्करली. (१९१८)
महत्व
१. International Project Management Day