दिनविशेष ४ एप्रिल || Dinvishesh 4 April ||

Share This:

जन्म

१. परवीन बाबी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९४९)
२. बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेटपटू (१९३३)
३. एन चंद्रा , भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९५२)
४. हून सेन , कंबोडियाचे पंतप्रधान (१९५१)
५. जेनिफर लिंच, अमेरिकेन चित्रपट दिग्दर्शक निर्मात्या (१९६८)
६. पंडीत नारायणराव वाघ, गायक (१९०२)
७. टॅड लिंकन, अब्राहम लिंकन यांचे चिरंजीव (१८५३)
८. मेनन अल्विंग , अभिनेत्री (१९२३)
९. अँथोनी पर्किंस, अमेरिकेन अभिनेता (१९३२)
१०. एडवर्ड लुकास, फ्रेंच गणितज्ञ (१८४२)

मृत्यु

१. गंगाधर मेहेर, ओडिया साहित्यिक (१९२४)
२. मार्टिन ल्यूथर किंग, नोबेल पारितोषिक विजेते समाजसुधारक (१९६८)
३. जॉन नापियर, स्कॉटिश गणितज्ञ (१६१७)
४. विल्यम हेनरी हॅरिसन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८४१)
५. सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक (१९८७)
६. झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष (१९७९)
७. आनंद साधले, साहित्यिक (१९९६)
८. बॉब क्लार्क, अमेरिकेन चित्रपट दिग्दर्शक (२००७)
९. व्हिक्टर ऑटो स्टॉम्प्स, जर्मन लेखक (१९७०)
१०. मॅक्स फ्रिश्च, लेखक (१९४१)

घटना

१. हिमाचल प्रदेश येथील कांग्रा शहरात झालेल्या भूकंपात वीस ते पंचवीस हजार लोक मृत्युमुखी पडले. (१९०५)
२. लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (१९९०)
३.चीनने अधिकृतरित्या तिबेट हा रिपब्लिक ऑफ चीनचा प्रदेश असल्याचे जाहीर केले. (१९१२)
४. पनामा मधील कमुनिष्ट पार्टीची स्थापना झाली. (१९३०)
५. सेनेगलने फ्रान्सपासून स्वातंत्र्य जाहीर केले. (१९६०)
६. थायलंड मधील डेमॉक्रॅटिक पार्टीने सार्वत्रिक निवडणुक जिंकली. (१९७६)
७. जॅक मा यांनी चीनमधील इंटरनेट कंपनी अलिबाबाची स्थापना केली. (१९९९)
८. बोरिस टेडिक यांनी सर्बियाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. (२०१२)