जन्म

१. मोहन लाल सुखाडिया, राजस्थानचे मुख्यमंत्री (१९१६)
२. मिल्टन फ्रीडमन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (१९१२)
३. अमरसिंह चौधरी, गुजरातचे मुख्यमंत्री (१९४१)
४. पिटर रोसेग्गर , नोबेल पारितोषिक विजेते लेखक साहित्यिक (१८४३)
५. धनपट राय श्रीवास्तव तथा मुंशी प्रेमचंद, भारतीय सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक (१८८०)
६. के. शंकर पिल्लई, भारतीय लेखक , व्यंगचित्रकार (१९०२)
७. कियारा अडवाणी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९२)
८. गोपाल प्रसाद , भारतीय गणितज्ञ (१९४५)
९. पॉल डी. बॉयेर, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९१८)
१०. वैद्यनाथस्वामी संन्थनाम्, भारतीय वैज्ञानिक (१९२५)
११. जे. के. रोलिंग, इंग्लिश लेखिका (१९६५)
१२. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, संतसाहित्याचे अभ्यासक (१८७२)
१३. दामोदर धर्मानंद कोसंबी, भारतीय गणितज्ञ (१९०७)

मृत्यू

१. उधम सिंग, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९४०)
२. मोहम्मद रफी, भारतीय गायक , संगीतकार (१९८०)
३. डॅनिश दिडेरोट, फ्रेंच लेखक (१७८४)
४. धीरन चिन्नमलाई, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८०५)
५. श्रीपाद दामोदर सातवळेकर, भारतीय चित्रकार (१९६८)
६. अँड्र्यू जोहन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८७५)
७. रिचर्ड कुहन, नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ (१९६७)
८. नबरूण भट्टाचार्य, भारतीय पत्रकार (२०१४)
९. फ्रान्सिस्को गोम्स, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (२००१)
१०. व्ही. जी. सिद्धार्था, भारतीय उद्योगपती (२०१९)

घटना

१. जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश झाला. (१९९२)
२. बेंजामिन चेंबर्स यांनी ब्रीच लोडींग कॅननचे पेटंट केले. (१८४९)
३. तिबेटमध्ये चीन विरोधात आंदोलन सुरू झाली.(१९५८)
४. चंद्राचे पहिले स्पष्ट छायाचित्र रेंजर ७ या अंतराळयानाने पाठवले. (१९६४)
५. अर्टुरो इल्लिया हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६३)
६. अपोलो १५ या मोहिमेत डेव्हिड स्कॉट आणि जेम्स अर्विन यांनी चंद्राच्या जमिनीवर सहा ते सात तास लूनार रोव्हर वेहिकल चालवत चंद्राच्या विवीध जागेचे नमुने गोळा केले. (१९७१)
७. नेपाळमध्ये डोंगराळ भागात झालेल्या बस दुर्घटनेत १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९९२)
८. भारतीय चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. (२००१)

आणखी वाचा:  दिनविशेष ८ ऑगस्ट || Dinvishesh 8 August ||

महत्व

१. World Ranger Day

Share This: