जन्म
१. धुंडिराज गोविंद फाळके, दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक (१८७०)
२. मीनाक्षी लेखी, भारतीय राजकीय नेत्या (१९६७)
३. कार्ल फ्रेडरिक गॉस , जर्मन गणितज्ञ (१७७७)
४. रोहित शर्मा, भारतीय क्रिकेटपटू (१९८७)
५. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९०९)
६. सिमोन कुझनेट्स, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ (१९०१)
७. सोनल मानसिंह, भारतीय नर्तक (१९४४)
८. बिजार्णी बेनेडिकट, आयस्लॅडचे पंतप्रधान (१९०८)
९. फ्रेडरिक चिलुंबा, झांबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९४३)
१०. अँटोनीक गुटेरेस, पोर्तुगालचे पंतप्रधान (१९४९)
११. श्रीनिवास खळे, संगितकार (१९२६)
१२. स्टेफन हार्पर, कॅनडाचे पंतप्रधान (१९५९)
मृत्यू
१. अचला सचदेव, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२०१२)
२. मोरो केशव दामले, निंबंधकार (१९१३)
३. वसंत पोतदार, मराठी साहित्यिक (२००३)
४. लुईस सांचेझ, पेरुचे पंतप्रधान (१९३३)
५. अडॉल्फ हिटलर, जर्मन हुकूशाह, नाझी पार्टीचे अध्यक्ष (१९४५)
६. खालिद चौधरी, बंगाली कलाकार (२०१४)
७. जॅकोब प्रेसर, इतिहासकार लेखक (१९७०)
८. दोर्जी खांडू, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री (२०११)
९. श्रीपाद अच्युत दाभोळकर, कृषितज्ञ, गणितज्ञ (२००१)
१०. चूनी गोस्वामी, भारतीय फुटबॉलपटू (२०२०)
घटना
१. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१७८९)
२. रेड आर्मीने बर्लिन शहरास वेढा घातला आणि अडॉल्फ हिटलरने आपल्या पत्नीसोबत फाशी घेतली. (१९४५)
३. इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण झाले. (१९५५)
४. सेवाग्राम आश्रम महात्मा गांधी यांनी वर्ध्याजवळ स्थापन केला. (१९३६)
५. World Wide Web पहिल्यांदाच टीम बरनर्स ली यांनी सार्वजनिक रित्या लॉन्च केले. (१९८९)
६. भारतात नऊ राज्यातील विधानसभा बरखास्त झाल्या आणि समाजवादी पक्ष , जनसंघ अश्या विविध पक्षांनी मिळून जनता पक्ष स्थापन करण्याचे ठरवले. (१९७७)
७. परवेझ मुशर्रफ हे पुन्हा पाच वर्षांसाठी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (२००२)
८. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या थेऊर येथील स्मृतीमंदिराचे उद्घाटन झाले. (१९९६)
महत्व
१. International Jazz Day
२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती