जन्म

१. सत्यजित रे , भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९२१)
२. विल्यम पेट्टी, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३७)
३. वसंतराव देशपांडे, भारतीय शास्त्रीय गायक (१९२०)
४. विजय चव्हाण , मराठी चित्रपट अभिनेते (१९५५)
५. अब्राहम गेस्नेर , कॅनाडियन भूगर्भशास्त्रज्ञ (१७९७)
६. ब्रायन लारा, वेस्ट इंडिज क्रिकेटपटू (१९६९)
७. सौम्या स्वामिनाथन, भारतीय वैज्ञानिक (१९५९)
८. नीना वराकील, भारतीय लोंग जंप खेळाडू (१९९१)
९. रितू फोगाट, भारतीय महिला कुस्तीपटू (१९९४)
१०. डेव्हिड बॅकम , इंग्लिश फुटबॉलपटू (१९७५)
११. अमोज जॅकॉब, भारतीय क्रीडापटू (१९९८)

मृत्यु

१. लिओनार्डो दा व्हींची, इटलीचा चित्रकार (१५१९)
२. के. बालाजी, भारतीय चित्रपट निर्माते (२००९)
३. गिअल्लो नत्ता, इटालियन नोबेल पारितोषिक विजेते वैज्ञानिक(१९७९)
४. वी किम वी , सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (२००५)
५. कोट्टायम पुष्पंनाथन, भारतीय लेखक (२०१८)
६. वीरेंद्र वर्मा, भारतीय राजकीय नेते (२००९)
७. पुरुषोत्तम काकोडकर, भारतीय राजकीय नेते (१९९८)
८. दिनकर केशव बेडेकर, विचारवंत (१९७३)
९. मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती (२००१)
१०. शांताराम आठवले, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७५)
११. फिरोझ मेहता, भारतीय लेखक (१९९४)

घटना

१. हॅनिबल गुडविन यांनी सेलुलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८७)
२. जर्मनीमध्ये अडोल्फ हिटलरने व्यापारी संघटनांवर बंदी घातली. (१९३३)
३. बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले. (१९९४)
४. जनरल मोटर्सने शेवरेल मोटर कंपनी विकत घेतली. (१९१८)
५. एस राजेंद्रबाबू भारताचे ३४वे सरन्यायाधीश झाले. (२००४)
६. बाबाराव सावरकर व तात्याराव सावरकर यांची अंदमानातून पुन्हा भारतात पाठवणी करण्यात आली. (१९२१)
७. अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून अबोटाबाद येथे लपून बसलेल्या कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचा खातमा केला. (२०११)

महत्व

१. World Tuna Day
२. World Laughter Day

SHARE