जन्म

१. विनायक दामोदर सावरकर, प्रखर राष्ट्रभक्त, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८८३)
२. एन. टी. रामाराव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, भारतीय चित्रपट अभिनेते (१९२३)
३. के. सच्चिदानंद, भारतीय लेखक कवी (१९४६)
४. शंतनुराव किर्लोस्कर, भारतीय उद्योगपती (१९०३)
५. बुलेंत सिवित, तुर्कीचे पंतप्रधान (१९२५)
६. बापूराव पलुस्कर, भारतीय शास्त्रीय गायक (१९२१)
७. वरदराजा वी. रमण, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३२)
८. नानासाहेब पुरोहित, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०७)
९. देवेंद्र सत्यार्थी, भारतीय लेखक ,कवी (१९०८)
१०. ज्येष्ठथराज जोशी, पद्मभूषण पुरस्कार विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९४९)

मृत्यू

१. बी. विठ्ठलाचारी , भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९९९)
२. जॉन रसेल, ब्रिटिश पंतप्रधान (१८७८)
३. गणपतराव नलावडे, हिंदुसभेचे नेते (१९९४)
४. रॉल्फ नेवनलिंना, गणितज्ञ (१९८०)
५. मेहबूब खान, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९६४)
६. ईलिया प्रिगोगिने, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२००३)
७. मार्तंडा भैरवा तोंडाइमन, पुदुकोत्ताईचे महाराजा (१९२८)
८. जेन्स ख्रिस्टियन स्काऊ, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (२०१८)
९. जॉर्जिओ मंग्नेल्ली, लेखक (१९९०)
१०. होरी तत्सुओं, जपानी लेखक (१९५३)

घटना

१. बेल्जियमने दुसऱ्या महायुद्धात जर्मनी पुढे शरणागती पत्करली. (१९४०)
२. नेव्हील चंबरलेन हे युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान झाले. (१९३७)
३. पॅलेस्टाईन लीबरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली. (१९६४)
४. ग्रीस मधील महिलांना मतदानाचा हक्क देण्यात आला. (१९५२)
५. अमनेस्टी इंटरनॅशनल या जागतीक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेला त्यांच्या कामाबद्दल नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. (१९६१)
६. पश्चिम बंगाल येथे झालेल्या तीव्र चक्रीवादळात २०,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९६३)
७. लिओनार्डो दा विंची यांचे “The last Supper” हे चित्र इटलीतील मिलान या शहरात प्रदर्शनात ठेवण्यात आले. (१९९९)
८. अब्देल फत्ताह एल सिसी हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२०१४)

महत्व

१. International Burger Day
२. International Amnesty Day
३. Whooping Crane Day

SHARE