जन्म

१. डॉ. भाऊराव पाटील, भारतीय शिक्षणतज्ञ (१८८७)
२. मायकल फॅराडे , इंग्लिश शास्त्रज्ञ (१७९१)
३. शिगेरू योशिदा, जपानचे पंतप्रधान (१८७८)
४. एन. कृष्णन पिल्लई, भारतीय मल्याळम लेखक (१९१६)
५. चार्ल्स हुग्गिनस, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०१)
६. अनंत माने, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९१५)
७. रामकृष्ण बजाज, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२३)
८. चेन निंग यांग, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२२)
९. पवन कुमार चामलिंग, सिक्कीमचे मुख्यमंत्री (१९५०)
१०. व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकीय नेते (१८६९)
११. रवी जाधव, भारतीय मराठी चित्रपट दिग्दर्शक (१९७१)

मृत्यू

१. गुरु नानक, शीख धर्म संस्थापक, शिखांचे पहिले गुरू (१५३९)
२. दुर्गा खोटे, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९१)
३. कार्लो स्टांहबलर्ग, फिनलंडचे पहिले राष्ट्राध्यक्ष (१९५२)
४. एस. वरालक्ष्मी, भारतीय चित्रपट अभिनेत्री (२००९)
५. फ्रेडरिक सोद्दी, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९५६)
६. अडॉल्फो मटिओस, मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष (१९६९)
७. बिभू भट्टाचार्य, भारतीय चित्रपट, टेलिव्हिजन अभिनेते (२०११)
८. मंसूर अली खान पतौडी, भारतीय क्रिकेटपटू (२०११)
९. जॉर्ज सी. स्कॉट, अमेरिकन अभिनेते (१९९९)
१०. शरदेंदू बंधोपाध्याय, भारतीय बंगाली लेखक (१९७०)

घटना

१. जर्मन जहाजाने हल्ला केल्यामुळे ब्रिटिश जहाज समुद्रात बुडाले , यामध्ये १५००हून अधिक ब्रिटिश लोक मृत्यूमुखी पडले. (१९१४)
२. भारत पाकिस्तानमध्ये चालू असलेले युद्ध संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर थांबले. (१९६५)
३. माली पूर्वीचे फ्रेंच सुडानने फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले. (१९६०)
४. भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९९८)
५. इराकने इराण पादाक्रांत केले. (१९८०)
६. इराकने संविधान स्वीकारले. (१९६८)
७. चीनने अणुबॉम्ब चाचणी लोप नोर या ठिकाणी केली. (१९६९)
८. बेसलच्या तहानंतर स्विझरलँड हा स्वतंत्र देश म्हणून ओळखला जावू लागला. (१४९९)
९. पाकिस्तान मधील चर्च मध्ये झालेल्या आत्मघात बॉम्ब स्फोटात ७०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)
१०. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमेरिकेतील ह्युस्टन या शहरात “Howdy , Modi!! ” नावाने भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. (२०१९)

महत्व

१. International Day Of Radiant Peace
२. World Rhino Day
३. World Car Free Day

SHARE