Share This:

जन्म

१. जे. कृष्णमूर्ती, भारतीय विचारवंत ,लेखक (१८९५)
२. के. जी. बालकृष्णन, भारताचे ३७वे सरन्यायाधीश (१९४५)
३. सॅम नुजॉमा, नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२९)
४. विजय भट, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१९०७)
५. गुलमरमो इंडारा, पणामाचे राष्ट्राध्यक्ष (१९३६)
६. अरुणा साईराम, भारतीय गायिका (१९६०)
७. रमनलाल देसाई, गुजराती लेखक (१८९२)
८. शिखा पांडे, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८९)
९. नंदू नाटेकर, भारतीय बॅडमिंटन खेळाडू (१९३३)
१०. इ. एस. राजा गोपाल, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (१९३६)

मृत्यू

१. सरत पुजारी, भारतीय चित्रपट अभिनेते (२०१४)
२. जेदर्झेज स्नियादेकी, भौतिकशास्त्रज्ञ (१८३८)
३. एम. ए. मुथिया चेट्टिर, भारतीय राजकीय नेते (१९८४)
४. नेली साचस, नोबेल पारितोषिक विजेती लेखिका (१९७०)
५. बेंजामिन शेअरस, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९८१)
६. कॉर्नेल बोरचर्स, जर्मन अभिनेत्री (२०१४)
७. माऊनो कोईविस्तो, फिनलॅडचे राष्ट्राध्यक्ष (२०१७)
८. जोहान पीटर, जर्मन कवी ,लेखक (१७९६)
९. जॉन एफ. हर्चेल, ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (१८७१)
१०. लूक व्हॅन ब्रबंत, फ्लेमिश लेखक ,कवी (१९७७)

घटना

१. भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. (१९५२)
२. राव जोधपूर यांनी राजस्थानमध्ये आधुनिक शहराचा पाया रचला, पुढे त्यांच्याच नावाने शहराचे नाव जोधपूर करण्यात आले. (१४५९)
३. चीनमध्ये झालेल्या तीव्र भूकंपात ६००००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक लोक जखमी झाले. (२००८)
४. अमेरिकेत पहिल्यांदाच विदेशी महिला राजदुतांची नेमणूक झाली. भारताच्या विजया लक्ष्मी पंडीत यांनी तो पदभार सांभाळला. (१९४९)
५. एस एच कपाडिया हे भारताचे ३८वे सरन्यायाधीश झाले. (२०१०)
६. गाज सिंघ हे नवे जोधपूरचे महाराजा झाले. (१९५२)
७. पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००७)
८. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी covid १९ काळात २० लाख करोड रुपयांची आर्थिक मदत घोषीत केली. (२०२०)

महत्व

१. International Myalgic Encephalomylitis
२. International Nurses Day