मी पुन्हा त्या वाटेवरूनी, तुला पहात जावे!!
किती ते नजारे, आणि किती ते बहाणे!!
कधी उगाच त्या वाटेवरती, घुटमळत राहता!!
कोणती ही ओढ मनाची, कोणते हे तराणे!!
कशी आस लागली, या मनास कोणती??
त्यास वेडे म्हणावे, की निशब्द रहावे!!
सांगशील का, एकदा मला तु हे काही??
प्रेमाची चाहूल म्हणावे, की उगाच स्वप्नी रहावे!!
कधी पावसाच्या सरी, तुझी आठवण देती!!
तुझ चिंब भिजलेले पहावे, की स्वतःस शोधावे!!
कधी नजर भिरभिरते, सगळीकडे उगाच!!
मनास समजुन सांगावे, की नजरेत तुझ पहावें!!
हे सारे जणु, भास मनीचे चालता!!
हे क्षण खोटे ठरावे, की स्वतःस थांबवावे!!
ती वाटही पुसते, आज मझ काही!!
तुझेच नाव घ्यावे, की तुलाच मग लपवावे!!
का मी उगाच, तेव्हा त्या वाटेवरती!!
तुला पहात राहावे, आणि तुलाच न पहावें!!
घुटमळत राहावे त्या, आठवणी भोवती!!
तुलाच ते सांगावे, की नकळत तुझ्यावर प्रेम करावे!!
-योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*