"तो पाऊस आणि ती खिडकी मला खूप काही बोलतात आठवणींच्या कित्येक थेंबात मला चिंब भिजवून जातात!! कधी अगदी मनसोक्त बरसून माझ्या सवे ते गातात कधी अगदी सरी त्या निवांत माझ्यात हरवून जातात!! खिडकी जवळ मला कधी उगाच बोलावून घेतात भिजलेल्या अंधुक आठवणीत ते भास मज का होतात!! बेफाम बरसताना भान हरपून त्या सरी पाहत राहतात सोबतीस आज नाही कोणी मलाच का ते विचारतात!! तो वाफाळलेला चहा पीत असेच क्षण निघून जातात तिच्या कित्येक प्रश्नाची उत्तरे मनातच अखेर राहतात!! अबोल मला बोलण्यास त्या सरी कित्येक वेळ बरसत राहतात खिडकी जवळ येतात आणि एकट्याच बोलत राहतात!! अगदी मनापासून ...!!" ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*
