‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन!!’ या गोष्टीमुळे कित्येक नाती तुटुन जातात.मध्यंतरी माझ्याच बद्दल असे अनुभव आले त्यावरून काही ..
एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत नाही. म्हणुनच मी कित्येक वेळ पुस्तक वाचत बसलो. तासनतास पुस्तक वाचल्यावर ज्या गोष्टीचा राग आला त्या गोष्टीवर मी विचार करायला लागलो आणि खरंच ती गोष्ट इतकी महत्वाची नव्हतीच की आपण जशास तसे वागु. अखेर सर्व विसरुन मी माझ्या कामाला लागलो. सांगायचा मुद्दा हाच की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्याव ते. जशास तसे वागण्यापेक्षा मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे पसंत केलं.
परवाच एका मित्राच त्याच्या मित्रांशी भांडन झालं खरंतर कारण कोणी तिसरीच व्यक्ती होती. खुप वेळ भांडल्यावर त्यांना लक्षात आलं की खरंच आपण ज्या गोष्टीमुळे भांडतोय त्यात काही तथ्य आहे का? ज्या व्यक्तीमुळे भांडण झालं ती व्यक्ती ज्यावेळी समोर आली तेव्हा, ‘तो मला अस बोलला म्हणुन मी त्याला तस म्हणालो!!’ या एका वाक्यावर येऊन थांबली. म्हणजेच काय तर ‘तु तसा वागलास म्हणुन मीही तसाच वागेन !!’ दोघांनीही खुप विचार केला आणि भांडण किती निरर्थक होतं हे त्याना कळालं.
‘तु बोलत नाहीस म्हणुन मीही बोलणार नाही, तो आला नाही म्हणुन मीही जाणार नाही, या सगळ्यातुन फक्त आपलाच कोतेपणा दिसतो हे खरंच सांगावं लागत का.? कोण कसं वागतं आपल्याशी त्यावर आपण आपलं वागणं ठरवावं का? तर मी म्हणेन मुळीच नाही. आपण का बदलावं स्वतःला. आपण कस वागावं ते यांनी का ठरवावं? म्हणजे कोणी आपल्याशी वाईटच वागत असेल तर अशा व्यक्तीला कितपत प्रतिसाद द्यायचा हे आपल्यावरंच असतं अखेर.
मध्यंतरी माझंही असंच झालं एका व्यक्तीशी बोलण्याच्या नादात आपलीच विचारांची पातळी कमी करतोय असं मला जाणवून आलं. म्हणजे झालं काय की जर त्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट या गोष्टीतला फरकच जर कळत नसेन तर बोलुन तरी काय फायदा असं वाटु लागलं. या काळात मला एक गोष्ट जाणवली माझ्या विचारांची दिशा वाईट विचारांकडे जातेय. आपण कोणालातरी काहीतरी बोलण्याच्या नादात विचारांची पातळी खालावतेय हे स्पष्ट जाणवुन आलं. शेवटी ती व्यक्ती आणि ते विचार याच्यावर खरंच विचार करण्याची वेळ आली हे जाणवलं. आणि आपण कोणासाठी का बदलावं हा निष्कर्ष निघाला. शेवटी ती व्यक्ती कशी वागली किंवा सर्व कळूनही नकळल्याचे सोंग त्या व्यक्तीने केले याचा विचार न करता मी तो विषय आटोपला.
आणि अखेर एक ठरवलं की ‘तु कसाही वाग माझ्याशी वाईट , चांगलं मी मात्र माझ्या स्वभावात आहे, माझ्या विचारांना पटेन तसंच वागणार. एखेर नातं हे ओढुन ताणुन टिकत नसतं , पटलं तर रहा नाहीतर जा असही नसतं. तर नातं हे समजुन वागण्यात असतं. ती माझ्यावर चिढली म्हणून मीपण तिच्यावर चिढणार, तो माझ्याशी खोट बोलला म्हणुन मीपण बोलणार, ती माझ्याशी बोललीच नाही म्हणुन मीपण नाही बोलणार या सगळ्यात फक्त आपल्या मनातली संकुचित भावना वाढते आणि तो अस तर मी अस या गोष्टी होतात. पण मी म्हणेन तो किंवा ती कसे ही असो मी असा आहे माझ्या विचारांशी मतांशी, आणि याला महत्व असतं. कारण नात्यात स्वतःच मत फार महत्त्वाचं असतं.
अखेर मी एवढंच म्हणेन तो असा म्हणुन मीपण तसा यातुन बाहेर येऊन खरंच नातं जपलं पाहिजे. कोणी अबोल राहिले तर बोलले पाहिजे, कोणी उगाच भांडले तर त्याच्याशी भांडायचे नाही तर चांगले बोलले पाहिजे. . .. तरंच नाती टिकतात .. क्षणासाठी तो असा तर मीपण तसा यात आयुष्यभराची नाती विरुन जाऊ नयेत हे पाहिलं पाहिजे…
✍योगेश खजानदार