"माझ्या एकट्या क्षणात
 तु हवी होतीस!!
 कुठे हरवले ते मन
 तु पाहात होतीस!!

 नसेल अंत आठवणीस
 तु खुप दुर होतीस!!
 साद या वेड्या मनाची
 तु ऐकायला हवी होतीस!!

 मला साथ वादळाची
 तु एक शांत सांज होतीस!!
 अंधारलेल्या नभातील
 तु एक चांदणं होतीस!!

 मी मनातील धुन
 तु एक कविता होतीस!!
 सुरांनाही मोह होताच
 तु एक गाणं होतीस!!

 दुर या प्रवासाची
 तु एक वाट होतीस!!
 माझ्या एकट्या प्रवासात
 तु हवी होतीस!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE