तु हवी आहेस मला ||| LOVE POEM MARATHI ||

Share This
"तु हवी आहेस मला
 अबोल राहुन बोलणारी
 माझ्या मनात राहुन
 मला एकांतात साथ देणारी
 माझ्या शब्दांन मध्ये राहताना
 कवितेत जगणारी
 आणि डोळ्यातुन पाणी येताच
 अलगद ते पुसणारी!!
 
 तु हवी आहेस मला
 माझ्यावर रुसणारी
 मी जवळ येताच हळुच हसणारी
 माझ्या ह्दयात पहाताच
 स्वतःस शोधणारी
 आणि माझ्या मिठीत येताच
 स्वतः विसरणारी!!

 तु हवी आहेस मला
 माझी वाट पाहणारी
 उशिरा येताच माझ्यावर चिडणारी
 जन्मभराची साथ मागता
 माझ्या हाती हात देणारी
 क्षण न क्षण जगताना
 माझ्यावर प्रेम करणारी!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

अबोल प्रेम || ABOL PREM MARATHI POEM ||

Mon Aug 22 , 2016
न कळावे तुला कधी शब्दांन मधील भाव सखे मन ओतले त्यातुन तरी अबोल तुझ न प्रेम दिसे मी लिहावे किती सांग तरी प्रेम हे का शुन्य असे एक ओढ मझ भेटण्याची मनी तुझ्या का आज दिसे