"तु हवी आहेस मला
 अबोल राहुन बोलणारी
 माझ्या मनात राहुन
 मला एकांतात साथ देणारी
 माझ्या शब्दांन मध्ये राहताना
 कवितेत जगणारी
 आणि डोळ्यातुन पाणी येताच
 अलगद ते पुसणारी!!
 
 तु हवी आहेस मला
 माझ्यावर रुसणारी
 मी जवळ येताच हळुच हसणारी
 माझ्या ह्दयात पहाताच
 स्वतःस शोधणारी
 आणि माझ्या मिठीत येताच
 स्वतः विसरणारी!!

 तु हवी आहेस मला
 माझी वाट पाहणारी
 उशिरा येताच माझ्यावर चिडणारी
 जन्मभराची साथ मागता
 माझ्या हाती हात देणारी
 क्षण न क्षण जगताना
 माझ्यावर प्रेम करणारी!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक आठवण ती!!!

Photo by @thiszun (follow me on IG, FB) on Pexels.com विसरून जावी , पण ओठांवर आहे !!पुसून टाकावी …
Read More

2 thoughts on “तु हवी आहेस मला ||| LOVE POEM MARATHI ||”

  1. Please give translation also. It will be easy to understand the poem fully.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा