"त्या सुंदर संध्याकाळी , तू सोबत असावी!!
रेडिओवरच्या गाण्यानेही, तुझीच प्रीत गावी !!


वाफाळलेला चहा, आणि गप्पाची मैफिल असावी !! 
तू मनसोक्त बोलताना, जणु स्वतःत हरवून जावी !!


कधी नकळत हसू तुझे, जणु पावसाची चाहूल व्हावी !!!
नजरेत तुझ्या पाहताच, माझी ओढ का दिसावी ??


सारं काही इथेच आहे, जगाची तमा नसावी !!
तुझ्या आणि माझ्या मध्ये, कोणाची गरज असावी??


क्षण जणु थांबले इथे, ती झुळूकही थांबावी !!
शब्दही आतुर होता, तू कविता होऊन यावी!! 


सांज ती बोलता अशी, गुपित जणु सांगावी !!
तूझ्या माझ्या मनातले, सहज ओळखून जावी !!


मनातल्या भावनांना, वाट मोकळी करावी!!
जेव्हा त्या संध्याकाळी, तू सोबत असावी !!"


✍️ योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*