"पानांवर तुला लिहिताना कित्येक वेळा तुझी आठवण येते!! कधी ओठांवर ते हसु असतं आणि मनामध्ये तुझे चित्र येते!! कधी शब्दात शोधताना पुन्हा उगाच तुझ्याकडे येते!! भावना ती तुझीच असते कविता होऊन माझ्याकडे येते!! वहित लिहिलेले शब्द जेव्हा पानांवर ती कोरत येते!! चुरगळलेल्या पानांवरती कित्येक शब्द सोडुन येते!! वाचताना ओळ ती मनातील ह्रदयास ती सांगत येते!! लिहिलेल्या प्रत्येक शब्दांशी नातं ती जोडत येते!! मनातलंच ते सगळ माझ्या ओठांवर का कधी येते!! आणि पानांवर तुला लिहिताना कित्येक वेळा तुझी आठवण येते!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*