Contents
"ती तुझी मिठी मला खुप काही बोलायची मी आनंदात असताना जवळ मला घ्यायची कधी खुप दुर असताना ओढ मला लावायची आणि जवळ येताच अश्रुनांही विसरुन जायची!! ती तुझी मिठी मला खुप काही सांगायची कधी स्वतःला हरवुन माझीच होऊन जायची त्या दोन हाताच्या बंधनात सार जग सामावुन जायची आणि माझ्या स्वप्नांना मनातल्या गोष्टी सांगायची!! ती तुझी मिठी मला खुप समजुन घ्यायची माझ्या ओठांवरचे शब्द अचुक टिपायची रुसलेल्या मला कधी चटकन मनवायची आणि जवळ तु येताच तुझीच होऊन जायची.. !!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED *
READ MORE
जीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी
हरवले गंध हे
हरवी ती सांजही
क्षण न मला जपले
ना जपली ती नाती
द…
Read Moreपाठमोऱ्या तुला जाताना
थांबवावे वाटले मला
पण पुन्हा भेटण्याची ओढ मला
थांबवत होती तेव्हा
त्या वाटे…
Read Moreस्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घ…
Read Moreतु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गे…
Read Moreतिने रुसुन बसावे
मी किती मनवावे
नाकावरच्या रागाला
किती आता घालवावे
उसण्या रागाचे बघा
किती नखरे …
Read More