तुझ्या आठवणीत || MARATHI SUNDAR KAVITA ||

Share This:
असं नाही की तुझी आठवण येत नाही!!
 पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही!!
 समजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही!!
 क्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही!!
 उगाच भांडत बसत ते माझ्याशी
 आणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही!!
 सांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही!!

 असं नाही की नजर तुला पाहण्यास आतुर नाही!!
 या नजरेत तुझ्याशिवाय आता कोणी राहतही नाही!!
 पापण्यांच्या आड थोड डोकावून पाहिलं तर
 आठवणीच्या अश्रूंन शिवाय काही भेटणारी ही नाही!!
 सोबत करतं मला तुझी आणि गालावरती ओलावतही नाही!!
 कारण तुझ्या आठवणीत ते आता काही बोलतही नाही!!

 असं नाहीं की हा श्वास आता तुझ्याशिवाय राहत नाहीं!!
 प्रत्येक श्वासात मला आता तुझी आठवण देत नाही!!
 उगाच तुझा गंध आता या क्षणासही लावत नाही!!
 अधुऱ्या त्या वाटेवरती तुझी वाटही पाहत नाही!!
 कारण हा श्वास आता तुझ्यावर रागावतही नाही!!
 असं नाही की तुझी आठवण येत नाही!!
 पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही ..!!
 ✍️© योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*