"समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते!! शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते!! डोळ्यात तुझ्या पाहताच तुझ्याकडेच का ओढली जाते मिठीत तुझ्या यावे आज ती रात्र का बोलत राहते!! सख्या मनातले माझ्या मनातच का आज राहुन जाते तुझ्यावरचे प्रेम ते माझ्या अबोल ओठांवरच का राहते!! समजुन घे ना मनास या डोळ्यांनी ते खुप बोलुन जाते मिठीत तुझ्या तेव्हा ते तुला घट्ट धरून राहते!! आणि तु समोर असताना तुझ्यातच मी मिळून जाते!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
