"न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे!! तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे!! कसे समजावे डोळ्यांना ही ते पाहतात ती तुच असे!! रागावलेल्या कडां मध्ये ही माझे चित्र का अंधुक दिसे!! कुठुन येतो तो अबोला तु मजला का बोलत नसे!! शब्दांविना सर्व काही आज तुला ते कळते कसे!! कोणता हा राग सारा कारण कोणते न दिसे!! न कळावे भाव तुझे तरी मन शोधते त्यास कसे!! का असे हे रागावने तुझे मनास का काही कळत नसे!! आणि तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*