"तुझी साथ हवी होती मला सोबत चालताना वार्या सारख पळताना पावसात भिजताना आणि ऊन्हात सावली पहाताना!! तुझी साथ हवी होती मला दुःखात रडताना आनंदाने हसताना हरवलेल्या मला शोधताना आणि पुन्हा हरवुन जाताना!! तुझी साथ हवी होती मला तुझ्यावर खुप प्रेम करताना जीवनभर हात मागताना आयुष्याचे स्वप्न पहाताना आणि तुला माझी करताना!! तुझी साथ हवी होती मला खुप काही बोलताना न बोलता ही समजुन घेताना तुला सुरात गातांना आणि ते सुर आपलेसे करताना!! तुझी साथ हवी होती मला तुला मी पहाताना माझी तु होताना मला ती साथ देताना आणि ह्रदयास बोलताना तुझी साथ हवी होती मला !! " - योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*