तिरंगा (२६ जानेवारी) || January 26|| Republic Day

गणतंत्र दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या भारताचे संविधान लागू झाले. तो दिवस साऱ्या भारतवर्षात प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता , लोकांची सत्ता म्हणून साजरा केला जातो. कित्येक राज्य, कित्येक धर्म , कित्येक जाती एक झाल्या, त्या या तिरंग्या समोर , विविधतेत एकता म्हणतात ते याचसाठी. अशा या भारत देशाचा ध्वज आकाशात डौलात फडकताना एक अभिमान वाटतो त्या वाऱ्यासही , प्रत्येकवेळी नव्याने चैतन्य पसरते त्या आकाशातही, गंध हरवुनी जाते ते फुलंही.. आणि एकजीव होऊन जाते सारे तो राष्ट्रध्वज येता समोरी, अशा या भारतमातेला कितीही वेळा नमन केले तरी पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे वाटते …

 वाऱ्यास अभिमान एवढाच काही!!
 डौलात फडकत्या तिरंग्यास पाही!!
 क्षणोक्षणी त्यास मग स्पर्शून जाई!!
 आपुल्यास साऱ्या गुणगान गाई!!

आभाळी एक तेव्हा नवचैतन्य येऊनी!!
 साऱ्या आसमंतात भरून जाऊनी!!
 त्या तिरंग्यास जेव्हा कवेत घेऊनी!!
 आकाश होते ठेंगणे त्याहुनही!!

उधळले फुल जाणले पाकळ्यांनी!!
 गंध सारे दरवळे चारी दिशांनी!!
 काही थांबले काही रेंगाळूनी!!
 तिरंग्यात जणू हरवले गंधाळूनी!!

शब्द भारावले ओठावर येवूनी!!
 गर्व होता उर येई भरुनी!!
 तिरंग्यास कित्येक वंदन करुनी!!
 या भारतमातेस नतमस्तक होऊनी!!

तेव्हा, आठवणीत यावे कित्येक क्षणही!!
 शहीद जवान आणि त्यांचे आयुष्यही!!
 मातीत घडले कित्येक महापुरुषही!!
 तेच खरे या तिरंग्याची शानही!!

वाऱ्यास अभिमान एवढाच काही!!
 डौलात फडकत्या तिरंग्यास पाही!!

✍️©योगेश खजानदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *