"चांदनी ही हल्ली तिला
 खुप काही बोलते!!
 तिच्या मनातल ओळखुन 
 आपोआप तुटते!!
 
 ते पाहुन ती ही
 हळुच हसते !!
 मनातल्या त्याला
 चांदण्यात पाहते!!
 
 ते हसणे बघुन
 नभ ही लाजते!!
 चंद्रा सवे मग तेही
 ढगाआड लपते!!

 तिच्या मनातील तो
 कोण आहे विचारते!!
 तिने नाही सांगताच
 चांदणी मागे धावते!!

 किती विचारले तिला
 ती रात्र आता थकते!!
 नभी एक गोंधळ
 ही प्रेम कोणावर करते!!

 सांग तरी आता
 ति चांदणी का तुटते!!
 प्रेम केले ज्याच्यावर
 त्याची आठवण का सतावते!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE