नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली! सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली! कवितेतल्या त्या जगात मग, चिंब भिजत राहीली!! कधी शब्दातून, कधी नजरेतून, उगाच बोलत बसली! इथे कधी मग, तिथे असेल बघ, उगाच शोधत फिरली!! मनास कोणता भास असा हा, मलाच विचारू लागली! आठवांच्या या दुनियेत मला तू, सहज घेऊन चालली!! वाट अशी ही एकांताची, साथ तुझी लाभली! जुन्या वहीच्या ओळी मधूनी, नेहमीच मला तू बोलली!! जीर्ण अश्या या पानावरती, तशीच तू राहिली!! जेव्हा, नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली !! ©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
