जुने मित्र आता हरवलेत कोणी खुप busy झाले!! तर कोणी खुप भाव खाऊ लागलेत खरंच जुने मित्र आता हरवलेत!! वेळ पाहुन आता भेटु लागले भेटुनही काही मित्र आता घड्याळात पाहु लागलेत!! खरंच जुने मित्र आता हरवलेत!! कोणी मोजकेच बोलु लागलेत!! तर कोणी काय बोलावं ते म्हणु लागलेत!! खरंच जुने मित्र आता हरवलेत!! कोणी success बद्दल बोलु लागलेत!! तर कोणी स्वतःचच गुणगान गाऊ लागलेत!! खरंच जुने मित्र आता हरवलेत!! कोणी माझ तुझ करु लागलेत तर कोणी उगाच तिरस्कार करु लागलेत कधी जुन्या भांडणाचे आता उगाच राग धरू लागलेत खरंच जुने मित्र आता हरवलेत!! सगळं share करणारे मित्र आता उगाच खोट बोलु लागलेत मित्रा सोबत दुखः वाटणारे उगाच खोटी प्रतिष्ठा जपु लागलेत!! खरंच जुने मित्र आता पुन्हा आठवणीत येऊ लागलेत!! एक कप चहासाठी पुन्हा कट्टयावर भेटु लागलेत!! वेळ न पहाता अवेळी येऊ लागलेत!! मनातल्या जुन्या आठवणी पुन्हा share करु लागलेत!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*