जीवन प्रवास || JIVAN MARATHI POEM ||

Share This
"जीवन एक प्रवास
 जणु फुल गुलाबाचे!!
 काट्यात उमलुन
 टवटवीत राहायचे!!

 हळुवार उमलुन
 क्षणीक जगायचे!!
 तोच आनंद खरा
 मनी मानायचे!!

 काट्यावर उभारुन
 दुःख विसरायचे!!
 दुसर्‍याच्या सुखासाठी
 स्वतः तुटायचे!!

 तुटुनही सर्वत्र
 सुगंध पसरवायचे!!
 जाता जाता एकदा
 मनसोक्त जगायचे!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

सुख || SUKH MARATHI KAVITA ||

Mon Oct 26 , 2015
चुकलेले मत हताश बळ लाचार जीवन पुन्हा ती वाट नाही!! शब्दाची कटुता तिरस्कार असता मनातील भावना प्रेम दिसत नाही!!