जिद्द || JIDD MARATHI KAVITA ||

"नव्या वाटांवर चालताना
  मी अडखळलो असेन ही!!
  पण जिंकण्याची जिद्द
  आजही मनात आहे!!

 सावलीत या सुखाच्या
  क्षणभर थांबलो असेल ही!!
  तळपत्या उन्हात चालण्यास
  आजही मी समर्थ आहे!!

 कधी सोबती माझ्या
  कोणी वाट चालेलही!!
  पण एकांतात थांबण्यास
  आजही मी निडर आहे!!

 त्या मार्गावरून कदाचित
  मी कुठे चुकेलही!!
  पण पुन्हा मार्ग शोधण्यास
  आजही मी खंबीर आहे!!

 त्या जिंकण्याची मशाल
  मझ आता खुणावते ही!!
  पण त्यासाठी लढण्यास
  आजही मी तयार आहे!!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एकांत || LONELY ||MARATHI POEM ||

हवी होती साथ पण सोबती कोण?? वाट पाहुनी!! शेवटी एकांत!! डोळ्यात अश्रु का केला हट्ट?? मनी प्रश्न…
Read More

Online || MARATHI POEM ||

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही …
Read More

मला माहितेय || MARATHI KAVITA ||

खुप बोलावंसं वाटतं तुला पण मला माहितेय आता तु मला, बोलणार नाहीस!! सतत डोळे शोधतात तुला पहाण्यास …
Read More

प्रवास || PRAWAS MARATHI POEM ||

“वाटा पडतात मागे वळणे ही नवीन येतात कधी सोबती कोणी कधी एकांतात रहातात अंधारल्या वेळी ही कधी चंद…
Read More

Next Post

भारत देश है मेरा!!!

Thu Jan 26 , 2017
येसा देश है मेरा!! हा यही तिरंगा है मेरा भारत देश है मेरा कणकण में बसता है विभिन्नतओ का देश है मेरा सम्मान है मेरा भाषाओं में अनेक है देश मेरा भिरभी जो एक है ऐसा जग में महान है देश मेरा