"नव्या वाटांवर चालताना मी अडखळलो असेन ही!! पण जिंकण्याची जिद्द आजही मनात आहे!! सावलीत या सुखाच्या क्षणभर थांबलो असेल ही!! तळपत्या उन्हात चालण्यास आजही मी समर्थ आहे!! कधी सोबती माझ्या कोणी वाट चालेलही!! पण एकांतात थांबण्यास आजही मी निडर आहे!! त्या मार्गावरून कदाचित मी कुठे चुकेलही!! पण पुन्हा मार्ग शोधण्यास आजही मी खंबीर आहे!! त्या जिंकण्याची मशाल मझ आता खुणावते ही!! पण त्यासाठी लढण्यास आजही मी तयार आहे!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
जिद्द || JIDD MARATHI KAVITA ||
