जिथे मी उरावे ! तिथे तू असावे !! जिथे मी पहावे !! तिथे तू दिसावे !! कधी न कळावे!! नजरेतूनी पहावे !! लपवून मी ठेवता!! तुला ते कळावे !! सांग या मना रे !! सांगते का तुला रे !! गाणे या ओठांवरी!! गाते का सख्या रे !! ओढ ती कोणती!! तुला न जानवावे!! माझ्यात मला मी!! तुझ्यात का शोधावे !! प्रेम असे का?? नकळत आज व्हावे !! सांगावे परी तुला!! ओठांवरी का रहावे !! अशी एक मी!! एक तु आज व्हावे!! तुझ्यात मी गुंतता, परी एकच रहावे !! आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !! एक ती वाट!! श्वास एकच व्हावे !! हात हातात तुझ्या!! आयुष्य मी जगावे !! ✍️योगेश