“२७ मार्च हा दिवस दर वर्षी संपूर्ण जगामध्ये जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवसाचे सर्वात प्रथम १९६२ मध्ये International Theatre institute यांनी आयोजन केले. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे नाटक, कला या रंगभूमीशी निगडित गोष्टींना जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळवून देणे हा आहे. आज विकसित तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्कृष्ट चित्रपट, बोलपट तयार केले जातात पण आजही रंगभूमी ही आपले अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे. यामधून कित्येक उत्कृष्ट कलाकार आपल्याला पाहायला मिळतात. ही सारी या रंगभूमीचीच देणं आहे. “

SHARE